निर्भया केस : पवन जल्लादने तिहार तुरूंगात 4 दोषींना फाशी देण्याची तयारी केली सुरु

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणी पटियाला हाऊस कोर्टाने दोषी अक्षयची याचिका फेटाळून लावली आहे. यासोबतच तिहार जेल प्रशासनाने पवन जल्लाद यांच्यासोबत मिळून पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. तिहार जेल प्रशासन पवनसह निर्भयाच्या चार दोषींच्या डमीला फाशी देण्याच्या तयारीत आहे. काही काळानंतर पवन जल्लाद यांच्याकडून डमीला फाशी देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

दरम्यान, आरोपी अक्षयच्या वकिलाने पटियाला हाऊस कोर्टात अर्ज दाखल करत 3 मार्च रोजी होणारी फाशी थांबविण्याची मागणी केली होती. अक्षयच्या वकिलांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला की, राष्ट्रपतींकडून त्याच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या दया याचिकेत संपूर्ण कागदपत्रे नाहीत, यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. अशा परिस्थितीत त्याला पुन्हा दया याचिका दाखल करण्याची परवानगी देण्यात यावी आणि फाशीची अंमलबजावणी थांबवावी. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपींचे सर्व कायदेशीर पर्याय संपले आहेत. या प्रकरणात, 3 मार्च रोजी सर्व दोषींना कायदेशीररीत्या फाशी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

क्युरेटिव्ह याचिका फेटाळली
दरम्यान, त्याच वेळी चार दोषींपैकी एक पवन कुमार गुप्ता याची क्युरेटिव याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सोमवारी बंद खोलीत सुनावणी झाली. न्यायमूर्ती एन.व्ही. रमण, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली.