निर्भया गँगरेप केस : फाशी दोषींच्या आणखीनच जवळ, नराधम पवनची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने घटनेवेळी अल्पवयीन असलेल्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना ही याचिका रद्दबातल ठरवली आणि सांगितले याचिकेत काहीही नवे नव्हते आणि घटनेवेळी दोषी पवन अल्पवयीन नव्हता. न्यायालयाच्या या आदेशाने निर्भयाच्या दोषींच्या फाशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता दोषींना फासावर लटकवणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
सर्वोच्च न्यायलायाने विशेष रजा याचिका (Special Leave Petition) दोषी पवन गुप्ताला मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने सांगितले की या याचिकेत नवे काहीही नाही. दोषी पवनकडून दावा करण्यात आला होता की तो घटनेवेळी अल्पवयीन होता, परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने याकडे दुर्लक्ष केले.
2012 Delhi gang-rape case: Supreme Court dismisses Special Leave Petition (SLP) filed by convict Pawan Kumar Gupta as the Court did not find any fresh ground in the matter. Pawan has claimed that he was a juvenile at the time of crime,& the Delhi High Court had ignored this fact. pic.twitter.com/8DrDGwSqQh
— ANI (@ANI) January 20, 2020
निर्भयाची आई म्हणाली, दोषींना फासावर चढवल्यावर मी समाधानी होईल
न्यायालयाच्या सुनावणीनंतर निर्भयाची आई आशा देवी म्हणाल्या की, फाशीला उशीर करण्याचा त्यांचा कट उथळला आहे, मला तेव्हाच समाधान होईल जेव्हा त्यांना 1 फेब्रुवारीला फासावर चढवण्यात येईल. दोषी एकामागोमाग उशीर करत आहेत. दोषींना एका पाठोपाठ फासावर चढवण्यात यावे म्हणजे त्यांना समजेल की कायद्याशी खेळल्याने काय होते.
Asha Devi, 2012 Delhi gang rape victim's mother: Their tactic to delay hanging has been rejected.I'll be satisfied only when they're hanged on Feb 1.Just like they're delaying it one after other, they must be hanged one by one so that they understand what it means to toy with law https://t.co/TrMRDOEIHf pic.twitter.com/wljyGjIBmb
— ANI (@ANI) January 20, 2020
उच्च न्यायालयाने पहिल्यांदाच फेटाळली याचिका –
दोषी पवन गुप्ता याची याचिका यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने दोषी पवनला अल्पवयीन सांगणारी याचिका फेटाळत पवनचे वकील एपी सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला होता.
निर्भया प्रकरणातील आणखी एक आरोपी मुकेश सिंह याची दया याचिका यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे. क्युरेटिव्ह याचिका रद्द ठरल्यानंतर मुकेशने राष्ट्रपतींकडे दयासाठी मागणी केली होती, परंतु आता त्याच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही.
- पालकांनो सावधान ! मुलांच्या बौद्धिक क्षमतेबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले ‘हे’ 6 मुद्दे
- जेवल्यानंतर पिऊ नका थंड पाणी ! ‘हे’ आहेत 4 धोके, जाणून घ्या
- ‘या’ 9 समस्यांवर केवळ एकच सहज सोपा उपाय, जाणून घ्या कोणता
- ‘या’ 4 कारणांमुळे सतत होतो सर्दी-खोकल्याचा त्रास
- मातीच्या तव्यावरील चपाती खाण्याचे 3 फायदे ! अशी घ्या काळजी
- सायकल चालवल्याने ‘या’ 4 रोगांचा धोका होतो कमी ! जाणून घ्या
- हात धुण्यासाठी 20 सेकंदांचा वेळ आवश्यक, ‘या’ 5 स्टेप्स वापरा