निर्भया केस : आता फाशीला ‘विलंब’ नाही, राष्ट्रपतींनी फेटाळली दोषी अक्षयची ‘दया’ याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषी फाशीला उशीर व्हावा यासाठी अनेक प्रयत्न करत आहे. याच प्रकरणातील आरोपी अक्षय ठाकूरची दया याचिका फेटाण्यात आलेली आहे. अक्षय ठाकूरने आपली दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवली होती परंतु राष्ट्रपतींनी ही दया याचिका रद्दबातल ठरवली आहे.

अक्षय पूर्वी या प्रकरणातील दोषी मुकेश आणि विनय यांची देखील दया याचिका राष्ट्रपतींनी रद्दबातल ठरवली होती. तर आणखी एक आरोपी असलेल्या पवनची ही याचिका अद्यात दाखल झालेली नाही. दोषी अक्षयने राष्ट्रपतींकडे 1 फेब्रुवारीला दया याचिका दाखल केली होती. परंतु राष्ट्रपतींने ती रद्द ठरवली आहे.

दरम्यान, निर्भया सामूहिक आणि हत्या प्रकरणातील दोषींची पुन्हा एकदा फाशी पुढे ढकलल्या गेली आहे. त्याविरोधात केंद्र सरकारद्वारे करण्यात आलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज निर्णय दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दोषींना वेगवेगळी फाशी देण्याची मागणी केली होती, याला नकार देण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या खालच्या न्यायालयाने (पटियाला हाऊस) फाशी टाळण्याचा निर्णय रद्द करण्यास नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने सांगितले की पटियाला हाऊस न्यायालयाद्वारे अनेकदा फाशी टाळण्याच्या निर्णयाशी सहमत नाही.

याआधी ही फाशी 1 फेब्रुवारीला होणार होती परंतु आता ही शिक्षा पुढील आदेशापर्यंत रोखण्यात आलेली आहे.