निर्भया केस : चारही दोषींना एकाच वेळी की वेगवेगळी फाशी होणार, 5 मार्चला होणार सुनावणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषींना वेगवेगळी फाशी होणार की एकत्र या केंद्र सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 5 मार्चपर्यंत सुनावणी टाळली आहे. ही सुनावणी टाळल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की 3 मार्चला दोषींना फाशी होणार की नाही ? तीन दोषींकडील कायदेशीर पर्याय संपले आहेत आणि चौथा आरोपी असलेला पवन पर्यायांचा वापर करण्यास इच्छुक नसल्याचे कळत आहे. त्यामुळे सर्व दोषींना 3 मार्चला होणारी फाशी निश्चित मानली जात आहे.

न्यायमूर्ती आर भानुमति, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना यांच्या पीठाने सकाळी 10.30 वाजता या प्रकरणाची सुनावणी केली. न्यायमूर्ती भानुमति सुट्टीवर असल्याने मागील आठवड्यात या प्रकरणावर होणारी सुनावणी होऊ शकली नाही. या प्रकरणी न्यायालयाने पहिल्यांदाच चारही दोषींना नोटीस जारी केली आहे.

केंद्र सरकारने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, चारही दोषी एकापाठोपाठ एक असे कायदेशीर पर्यायांचा वापर करत आहे. चारही दोषी कायद्याचा खेळ करत आहे.

सरकारने न्यायालयात सांगितले की ज्या दोषींचे कायदेशीर पर्याय संपले आहेत, त्यांना फाशी देण्यात यावी. उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सांगितले की चारही दोषींना एकत्र फाशी दिली जाईल. न्यायालयाने दोषींना सर्व उपलब्ध पर्यायाचा वापर करण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली होती.