शेवटच्या वेळी कुटूंबाला केव्हा भेटायचं ते सांगा, ‘तिहार’च्या प्रशासनानं निर्भयाच्या दोषींना ‘फर्मान’ काढून विचारलं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – निर्भया गँगरेप आणि मर्डर केसच्या चारही दोषींना तिहार कारागृह प्रशासनाने लेखी सूचना दिली आहे की, कुटुंबियांची शेवटची भेट जेव्हा घ्यायची असेल तेव्हा त्यांनी आपले कुटुंबिय आणि कारागृह प्रशासनाला सांगावे. मुकेश आणि पवन यांनी शेवटची भेट घेतली आहे, असा उल्लेख या नव्या आदेशात करण्यात आला आहे. दोषी अक्षय आणि विनय यांनाही कुटुंबियांची शेवटीची भेट घेण्यास सांगण्यत आले आहे. चौघांची साप्ताहिक भेट सध्या सुरू आहे.

जर निर्भयाच्या दोषींची फाशी टळली नाही तर दोषी त्यांच्या कुटुंबियांची शेवटची भेट घेतील. निर्भयाच्या चारही दोषींना 3 मार्चला सकाळी सहा वाजता फाशी दिली जाईल. पटियाला हाऊस कोर्टाने 17 फेब्रुवारीला नवे डेथ वॉरंट जारी करण्याच्या मागणीवर निर्णय दिला होता. निर्भयाच्या दोषींची फाशी सतत कायद्याच्या डावपेचामुळे टळत आहे.

निर्भया गँगरेप केसचे चार दोषी मुकेश कुमार सिंह, विनय कुमार शर्मा, अक्षय आणि पवन गुप्ता यांना फाशी होणार आहे. चारपैकी तीन दोषी मुकेश, विनय आणि अक्षय फाशीपासून वाचण्यासाठी राष्ट्रपतींकडे दया याचिका करून मोकळे झाले आहेत. परंतु, त्यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. यामुळे तिघांच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्याकडे आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. परंतु, चौथा दोषी पवन गुप्ताने अजूनही सुप्रीम कोर्टाकडे क्यूरेटीव्ह पिटीशन दाखल केलेली नाही, तसेच राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केलेला नाही.

3 मार्चची फाशी टळू शकते

पवन गुप्ताने जर आपल्या पर्यायांचा वापर केला तर 3 मार्चची चौघांची फाशी टळू शकते. जर पवनने फाशीच्या आधी म्हणजे 29 फेब्रुवारीनंतर क्यूरेटिव्ह पिटिशन दाखल केली तर सुनावणीस वेळ लागेल आणि 3 मार्चची सकाळची फाशी टळू शकते. याशिवाय पवनजवळही एक पर्याय अजून बाकी आहे. तो राष्ट्रपतींकडे दया याचिका करू शकतो. त्याने राष्ट्रपतींकडे याचिका केल्यास निर्णय येण्यास वेळ लागू शकतो.

नवे डेथ वॉरंट असे झाले जारी

पटियाला हाऊस कोर्टाने 17 फेब्रुवारीला जे तिसरे डेथ वॉरंट जारी केले होते, त्याचा आधारह हेच झाले. कोर्टाकडे मागणी केली गेली की, कोणत्याही दोषीची कोणतीही यचिका प्रलंबित नाही, यामुळे डेथ वॉरंट जारी करण्यात यावे.

You might also like