निर्भया केस : पोस्टमार्टम केल्यानंतर कुटूंबियांकडे सोपविण्यात आलं दोषींचं ‘पार्थिव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखेर 7 वर्षांनी का होईना पण निर्भयाला न्याय मिळाला. 20 मार्चला सकाळी 5.30 वाजता दोषींना तिहार तुरुगांत फासावर चढवण्यात आले. या दरम्यान तुरुंगात लॉकडाऊन होते परंतु तिहार तुरुंगाच्या बाहेर बरीच गर्दी जमली होती. तुरुंगाबाहेर जमलेल्या लोकांनी निर्भयाला अखेर न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

निर्भयाच्या आईने 20 मार्च हा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे दोषींचे वकील एपी सिंह अखेरपर्यंत दोषींना वाचण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु रात्री उशीरा सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सर्व विनावण्या रद्द ठरवल्या. ज्यानंतर सर्व चारही दोषींना फासावर चढवण्याचा मार्ग रिकामा झाला.

दोषींच्या शवाचे शवविच्छेदन –
चारही दोषीच्या फाशीनंतर त्यांच्या शवाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यासाठी त्यांचे शव रुग्णावाहिकेद्वारे दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात नेण्यात आले होते. डॉ. बीएन मिश्रा यांच्या नेतृत्वात पाच डॉक्टरांकडून शवविच्छेदन करण्यात आले. या पूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेले आहे. दुपारी 1 च्या सुमारास दोषींच्या शवाचे शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर त्यांचे शव त्यांच्या नातेवाईकांना सोपावण्यात आले.

30 मिनिट लटकत होते मृतदेह –
निर्भयाच्या दोषींना सकाळी 5.30 ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर शव 30 मिनिटे फासावर लटकत होते. जवळपास 6 वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. निर्भयाच्या दोषींनी फाशी पूर्वीची कोणतीही शेवटीच इच्छा व्यक्त केली नाही. शव रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्यानंतर तिहार तुरुंगाचे दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर तुरुंगाची जबाबदारी घेणाऱ्या तमिळनाडू पोलिसांनी देखील फ्लॅग मार्च केला.