निर्भया केस : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी ठरवली रद्दबातल, उद्याच होणार फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून रद्दबातल ठरवण्यात आली आहे. दोषी पवनने फाशी टाळण्याचा अखेरचा मार्ग निवडला होता. सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर पवनने काही वेळातच राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली होती. ही याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रद्दबातल ठरवली आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच 3 मार्चला चारही दोषींना फाशी होणार हे निश्चित झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयनंतर निर्भयाच्या दोषींचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले होते, यादरम्यान पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिकेसाठी अर्ज केला होता. दोषी पवनचे वकील एपी सिंह म्हणाले होते, दुपारी 12 वाजता दया याचिका पाठवली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने चारही दोषींविरोधात 3 मार्चला डेथ वारंट जारी केले होते.

निर्भया सामूहिक आणि हत्या प्रकरणात दोषी पवन गुप्ता याची क्यूरेटिव्ह याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. पवनच्या या याचिकेवर पाच न्यायाधीशांच्या पीठाने सुनावणी करण्यात आली होती. ज्यात न्यायाधीश एन.वी. रमण, न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश आर.एफ. नरीमन, न्यायाधीश आर भानुमति आणि न्यायाधीश अशोक भूषण हे सहभागी होते.

डेथ वॉरंट जारी –
16 डिसेंबर 2012 साली धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती आणि दोषींनी निर्भयाला भयानक परिस्थितीत बसमधून बाहेर रस्त्यावर फेकले होते. एक आठवडा उपचार केल्यानंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता दोषी पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी देखील फेटाळली आहे. या केसमध्ये दोषींच्या विरोधात डेथ वारंट जारी केले गेले आहे. त्यानुसार 3 मार्चला सकाळी 6 वाजता दोषींना फाशी होईल.