निर्भयाच्या गुन्हेगारांची फाशीपूर्वी ‘हे’ खास ‘पुराण’ ऐकण्याची मागणी, कारण मृत्यू कमी ‘कष्टकरी’ व्हावा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील चार दोषींना 22 जानेवारी रोजी फाशी देण्यात येणार आहे. तिहार जेलमध्ये याबाबतची तयारी देखील पूर्ण झाली आहे. परंतु एका संघटनेने त्यांना फाशीवर लटकवण्यापूर्वी गरुड पुराण ऐकवण्याची मागणी केली आहे. मृत्यू पूर्वी गरुड पुराण वाचल्याने व्यक्ती मृत्यूची मानसिक तयारी करतो असे धार्मिक परंपरेनुसार मानले जात असल्याने संघटनेने अशा प्रकारची मागणी केली आहे.

सोयीस्कर होतो मृत्यू
कैद्याच्या सुधारणेबाबत काम करत असलेली संस्था राष्ट्रीय युवा शक्तीचे अध्यक्ष प्रदीप रघुनंदन यांनी सांगितले की, दोषींना शिक्षा देण्याची प्रक्रिया पूर्ण केली गेली आहे. त्याचे मरणे आता निश्चित झालेले असताना त्यांना कमी कष्टकरी आणि सोयीस्कर पद्धतीने मृत्यू दिला जावा. गरुड पुराण ऐकल्यानंतर दोषी मानसिक दृष्ट्या मृत्यूला सामोरे जाण्यासाठी तयार होतो. धार्मिक व्यवस्थेत असा विश्वास आहे की यामुळे त्यांना मृत्यू नंतर चांगला काळ मिळतो आणि मोक्ष प्राप्त होतो, म्हणूनच संस्थेने ही मागणी केली आहे की, फाशी देण्यापूर्वी त्यांना गरुड पुराण पठण करण्याची परवानगी देण्याची मागणी करतात.

16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावरील अत्याचारानंतर 29 डिसेंबर रोजी सिंगापूरच्या इस्पितळात उपचार घेत असताना तिचे निधन झाले. या घटनेनंतर देशभर संताप व्यक्त झाला. प्रदीर्घ सुनावणीनंतर पटियाला हाऊस कोर्टाने सर्व दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. 10 जानेवारी 2020 रोजी सर्व प्रक्रियेतून कोर्टाने डेथ वॉरंट जारी केला आणि 22 जानेवारी 2020 रोजी सकाळी सात वाजताची वेळ निश्चित केली. यातील दोन आरोपींची क्यूरेटिव पिटीशन दाखल केलेली आहे.14 जानेवारी म्हणजेच आज याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. परंतु याबाबत दोषींना वाचण्यासाठी कोणतीही संधी उरली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे गरुड पुराण
हिंदू धर्मातील साहित्यामधील अठरा पुराणांपैकी एक गरुड पुराण आहे. यामध्ये मृत्यू नंतर काय होते याबाबत भाष्य करण्यात आलेले आहे. महर्षी व्यासांनी लिहिलेल्या या ग्रंथामध्ये भगवान विष्णूंचे वाहन असलेल्या गरुडाने विष्णूंना अनेक प्रश्न केले होते ज्याची उत्तरे विष्णूंनी दिलेली आहेत. असे देखील सांगण्यात येते की यामध्ये आधी एकोणीस हजार श्लोक होते मात्र आता केवळ सात हजार बाकी आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –