निर्भया केस : निर्भयाच्या आईची साडी पकडून ‘ढसाढसा’ रडली ‘या’ आरोपीची ‘मम्मी’, म्हणाली – ‘माझ्या मुलाला…’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया गँगरेप अँड मर्डर केसमधील चारही आरोपींचं नवीन डेथ वॉरंट कोर्टानं जारी केलं आहे. आता चारही आरोपी मुकेश सिंह, अक्षय ठाकुर, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांना 1 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटवकलं जाणार आहे. यापूर्वी या आरोपींना 22 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7 वाजता फाशी दिली जाणार होती. पंरतु आरोपींची दया याचिका प्रलंबित झाल्यानं या फाशीला विलंब झाला. चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी झाल्यानंतर निर्भयाची आई, मित्र परिवार आणि वकिल यांना आनंद झाला. तर दुसरीकडे आरोपींच्या चेहऱ्यावरची चिंता वाढताना दिसली. तिहार जेलमध्ये आरोपींनी फाशीचा धसका घेतल्यानं खाणं – पिणं सोडलं आहे.

कोर्टात सुनावणी दरम्यान कोर्टाची कार्यवाही सुरु असताना आरोपी मुकेशची आई आपल्या मुलासाठी रडताना दिसली. आरोपी मुकेशची आई निर्भयाच्या आईकडे गेली आणि तिच्या साडीचा कोपरा पकडून ढसाढसा रडत भीक मागत म्हणाली, “माझ्या मुलाला माफ कर. मी त्याच्या जीवाची भीक मागते.”हे ऐकून निर्भयाच्या आईच्या डोळ्यातही पाणी आलं. तीही रडत म्हणाली, “ती माझी मुलगी होती. तिच्यासोबत जे पाशवी कृत्य झालं ते मी कसं विसरू ? मी न्याय मिळवण्यासाठी 7 वर्षे वाट पहात आहे.” यानंतर कोर्टातील गोंगाट पाहून न्यायधीशांनी शांत राहण्याचा आदेश दिला.

निर्भयाचे वडिल म्हणाले, “माझ्यासाठी हा दिवस सणासारखा आहे. असं वाटतंय सर्वांसोबत माझा आनंद वाटू. 16 डिसेंबर 2012 पासून आतापर्यंत तीळ तीळ जीव तुटला आहे. माझ्या मुलीचे शेवटचे शब्द रोज कानात घुमत असतात.”

निर्भयाची आई म्हणाली, “अखेर 7 वर्षांनंतर मुलीला न्याय मिळाला आहे. आता मृत्यू आला तरी बेहत्तर. आता आम्ही आमच्या मुलीला सांगू शकतो की, तिच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळाली आहे.”

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like