निर्भया केस : फाशीपुर्वी दोषींनी अंघोळीला का दिला नकार ? ‘त्या’ पहाटेचा घटनाक्रम आणतो अंगावर ‘काटे’

पोलीसनामा ऑनलाइन – निर्भयाच्या दोषींना अखेर सात वर्षानंतर शिक्षा देण्यात आली. शुक्रवारी २० मार्चला सहापैकी चार दोषींना सकाळी ५:३० वाजता फाशीवर लटकवण्यात आले. या फाशीची तिहार तुरुंगात तब्बल दीड तास तयारी सुरु होती. तिहार कारागृहाचे अधीक्षक, मॅजिस्ट्रेट आणि सुरक्षा रक्षक आणि पवन जल्लाद हे या क्षणाचे साक्षीदार ठरले.

निर्भयाच्या दोषींसाठी फाशीची तयारी तिहार कारागृहात दीड तासआधी तयारी सुरु
पहाटे ४.२० वाजता दिल्लीचे जिल्हा महादंडाधिकारी तिहार जेलला पोहोचले आणि फाशीची पूर्वतयारी सुरु झाली. फाशीघराचे जीने साफ करण्यात आले.

पहाटे ४.३२ वाजता चारही दोषींना चहा विचारला, नियमानुसार आंघोळ करणार का विचारले?, पण दोषी विनय, अक्षय, मुकेश आणि पवनने नकार दिला. त्यानंतर पहाटे ४.३७ वाजता जेल अधिकाऱ्यांनी फाशी घराची तपासणी केली. तुरुंग नियमावलीनुसार फाशी देण्यात येणाऱ्या दोषींना त्यांच्या आस्थेनुसार देवाची पूजा करण्यास दिली. नंतर पहाटे ४.४२ वाजता १० मिनिटे पूजा करण्यासाठी चौघांना वेळ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा दोषींना चहा नाश्ता विचारण्यात आला.

दरम्यान, फाशी घरात तयारी पूर्ण केली जात होती. तेथे १० फुटांचा फाशीचा तख्त उभारण्यात आला होता.

पहाटे ४.५२ चारही दोषींची वैद्यकीय तपासणी केल्यावर ते फिट असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तिहार कारागृहाराबाहेर कडेकोट बंदोबस्त, पॅरामिलिटरी फोर्स तैनात होती. पहाटे ४.५९ वाजता तुरुंग अधीक्षक त्यांच्या कार्यालयात गेले आणि शेवटचा काही निरोप आला आहे का ते त्यांनी पाहिलं. नंतर पहाटे ५.०२ मिनिटांनी दोषींना सेलच्या बाहेर काढले. जेल अधिकारी, सुरक्षा रक्षक दोषींसोबत पहाटे ५.१४ मिनिटांनी दोषी फाशीघरात पोचले. पहाटे ५.१७ मिनिटांनी तुरुंग नियमानुसार सर्व दोषींचे हात बांधण्यात आले. नंतर ५.२५ वाजता फाशीच्या तख्तावर दोषींना पोचवण्यात आले आणि चेहऱ्यावर काळा कपडा घातला. वैद्यकीय अधिकारी, जेल अधीक्षक आणि सुरक्षा रक्षक यावेळी उपस्थित होते. पहाटे ५.२३ मिनिटांनी चार दोषींचे पाय बांधण्यात आले. मेरठच्या पवन जल्लादने हे सर्व काम केले. पहाटे ५.२८ मिनिटांनी दोषींच्या गळ्यात फाशीचा दोरखंड घालण्यात आला आणि पहाटे ५.३० वाजता जेल अधीक्षकाने इशारा दिल्यानंतर पवन जल्लादने लिव्हर खेचला आणि फाशी दिली.