निर्भया केस : एकाच वेळी फासावर लटकलं जाणार नराधमांना, तिहारमध्ये 4 ‘तख्त’ आणि ‘सुरूंग’ तयार

नवी दिल्ली : वृत्तसंथा – तिहारमध्ये निर्भयाच्या मारेकर्‍यांना फाशी देण्याची सर्व तयारी झाली आहे. या प्रकरणातील चारही आरोपींना एकाच वेळी फाशी दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आता तिहार करागृह एक असे कारागृह होणार आहे, जिथे एकाच वेळी चार फास तयार आहेत. आतापर्यंत या कारागृहात फाशी देण्याची एकच जागा होती आता ही संख्या 4 करण्यात आली आहे.

तिहार जेलमध्ये फाशी देण्याची जागा तयार करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच पीडब्ल्यूडीने सोमवारी पूर्ण केले आहे. तिहार करागृहाच्या सुत्रांनी सांगितले की, हे काम पूर्ण करण्यासाठी कारागृहाच्या आत जेसीबी मशीनसुद्धा आणण्यात आली होती.

जेसीबी मशीनच्या सहाय्याने फाशी देण्याच्या तीन नवीन जागा तयार करण्यात आल्या. सूत्रांनी सांगितले की, ज्या ठिकाणी फाशी दिली जाते त्या खाली एक भूयारही तयार करण्यात येते. याच भूयारातून फाशीनंतर कैद्याचा मृतदेह बाहेर काढला जातो. सध्या तीन नवीन फाशीच्या ठिकाणांसह जुन्या ठिकाणातही काही बदल करण्यात आले आहेत.

6 डिसेंबर 2012 ला घडलेल्या निर्भया सामुहिक बलात्कारप्रकरणी दोषी ठरवलेल्या चार आरोपींच्या फाशीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. दोषींमध्ये अक्षय, पवन, विनय आणि मुकेशच्या डेथ वॉरंटवर पटियाला हाऊस कोर्ट 7 जानेवारीला सुनावणी घेणार आहे.

दरम्यान, दोषी आरोपींनी क्यूरेटिव्ह यचिका दाखल करण्यासंदर्भात तिहार जेल प्रशासनाला लेखी कळविले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार 19 डिसेंबररोजी दोषींची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टान फेटाळली होती. याच्या एक महिन्याच्या आत क्यूरेटिव्ह याचिका करता येते. नंतर दया याचिका शेवटचा पर्याय आहे. निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरण हे एक अत्यंत दुर्मिळ श्रेणीतील प्रकरण आहे. यामुळे दोषींना दिलासा मिळण्याची शक्यता खुपच कमी आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/