‘डेथ वॉरंट’ जारी झाल्यानंतर SC मध्ये गेला निर्भयाचा ‘गुन्हेगार’, ‘अल्पवयीन’ असल्याचा केला दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने निर्भया प्रकरणातील चारही गुन्हेगारांना फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट जारी केले होते. मात्र, त्यानंतर पवन कुमार नावाच्या गुन्हेगाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत नाबालिक असल्याचे सांगितले आहे. ए पी सिंह नावाच्या वकिलांनी या आरोपीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

पवन कुमार गुप्ता ने आपल्या याचिकेत म्हंटले आहे की, 16 डिसेंबर 2012 ला ज्यावेळी निर्भया सोबत गँगरेप झाला त्यावेळी तो नाबालिक होता. एवढेच नाही तर त्याने न्यायालयात हे देखील अपील केली की, तिहार जेल प्रशासनाला हे आदेश देण्यात यावेत की, एक फेब्रुवारी रोजी त्याला फाशी दिली जाऊ नये.

निर्भया प्रकरणी न्यायालयाने विनय शर्मा (26), मुकेश कुमार (32), अक्षय कुमार सिंह (31) आणि पवन कुमार गुप्ता या चार आरोपींना एक फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्याचे आदेश दिले आहेत.

गुन्हेगारांकडे अजून किती पर्याय शिल्लक ?
शुक्रवारी राष्ट्रपतींनी देखील यातील दोषी असलेल्या मुकेश कुमारची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे इतर तीन गुन्हेगारांकडे अजून देखील राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी संधी आहे.

निर्भया प्रकरणात अक्षय आणि पवनकडे सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव याचिका दाखल करण्यासाठी देखील संधी आहे. मात्र 14 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने विनय आणि मुकेश या दोन दोषींची क्यूरेटिव याचिका फेटाळून लावली.

डिसेंबर 2012 मध्ये, एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर रॉडने हल्ला केला गेला होता. विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले होते, तेव्हा तिचा 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. यात सहा आरोपी होते त्यातील एक नाबालिक असल्यामुळे त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली तर एकाने जेलमध्येच आत्महत्या केली. तर बाकी चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like