निर्भया केस : फाशी टाळण्यासाठी दोषी शोधतात ‘पळवाटा’, आता पुन्हा वापरला ‘हा’ पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषी असलेले पवन, विजय, मुकेश आणि अक्षय ठाकूर यांच्या वकीलाने म्हणजेच ए. पी. सिंग यांनी पुन्हा एकदा शुक्रवारी दिल्ली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. वकील ए. पी. सिंग यांनी याचिका दाखल केली आहे की तिहार तुरुंग प्रशासनाने अद्याप संबंधित कागदपत्र दिलेली नाहीत. एका वृत्ताद्वारे दावा करण्यात आला आहे की निर्भयाचे दोषी फासावर जाऊ नयेत म्हणून हा युक्तीवाद करण्यात आला आहे.

दोषींचे वकील एपी सिंह यांनी न्यायालयात सांगितले की तुरुंग प्रशासनाला कागदपत्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, जेणेकरुन शिक्षा भोगलेल्या दोषींना उर्वरित कायदेशीर उपाय देता येतील.

त्वरित आदेश द्या –

वकील सिंग यांनी पटियाला हाऊस न्यायालयासमोर दाखल केलेल्या याचिकेत विनय शर्माच्या दया याचिका, पवन कुमार गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांच्या कागदपत्रांची विनंती करण्याबाबत तातडीने न्यायालयाला आदेश मागितले आहेत.

अहवालानुसार, दोषींनी जे अर्ज केले आहेत त्यात सांगितले आहे की बऱ्याच विनंत्या करुनही विनय शर्माला दोषी ठरण्यासंबंधित कागदपत्रे पुरवली गेली नाहीत. आता संबंधित तुरुंगातील अधीक्षकांकडून पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूर यांची अशी कागदपत्र उपलब्ध करुन देण्याच्या सूचना देण्यात याव्यात.

एक अल्पवयीन, एकाने घेतली फाशी –

निर्भया प्रकरणात न्यायालयाने नुकतेच दोषींच्याविरोधात डेथ वारंट जारी करुन 1 फेब्रुवारी फाशीची तारीख निश्चित केली आहे. 16 डिसेंबर 2012 साली दिल्लीत वसंत विहार येथे फिरत्या बसमध्ये 23 वर्षीय निर्भयावर या दोषींकडून सामाहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणी राम सिंह याच्यासह 6 जणांचा सहभाग होता. यातील मुख्य आरोपीने तुरुंगात आत्महत्या केली होती तर एक आरोपी अल्पवयीन असल्याने शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला सोडण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा –