निर्भया केस : दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी होणे खूपच ‘कठीण’, जाणून घ्या ‘कारण’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील दोषींना 1 फेब्रुवारी पर्यंत फाशी दिली जाणार होती मात्र त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या पळवाटांच्या वापरामुळे ही फाशी पुढे ढकलली जाऊ शकते. मुकेश सोडून इतर तीन दोषींकडे अजूनही राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा पर्याय शिल्लक आहे. विनयने याबाबत राष्ट्रपतींकडे याचिका केली आहे. राष्ट्रपतींनी जरी त्यांची याचिका फेटाळली तरी ते सर्वोच्च न्यायालयात लावू शकतात.

दोषींच्या वकिलांनी पटियाला हाऊस कोर्टामध्ये फाशीची तारिक पुढे ढकलावी यासाठी अर्ज देखील केला आहे. एपी सिंह यांनी यावेळी याचिकेत म्हंटले आहे की, दिल्ली कारागृह नियमावलीतील तरतुदींचा संदर्भ देताना सांगितले आहे की या अंतर्गत शेवटच्या दोषीने दया याचिकेसह सर्व कायदेशीर पर्यायांचा उपयोग करेपर्यंत चारही दोषींना फाशी दिली जाऊ शकत नाही.

विनयची याचिका आहे प्रलंबित
बुधवारी विनयने राष्ट्रपतींकडे दया अर्ज केला होता. विनयची क्यूरेटिव पिटीशन या आधीच फेटाळली गेलेली आहे. मुकेशची याचिका राष्ट्रपतींनी या आधीच फेटाळली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयात केला गेलेला दावा देखील फोल ठरला आहे. त्यामुळे आता मुकेशकडे फासावर जाण्या व्यतिरिक्त कोणताही पर्याय शिल्लक नाही.

चार दोषींची सध्याची स्थिती
दोषी मुकेशची क्यूरेटिव पिटीशन आणि दया याचिका दोनीही फेटाळल्या आहेत. त्यामुळे त्याच्याकडे आता कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. दोषी अक्षय ठाकूरची देखील क्यूरेटिव पिटीशन रद्द करण्यात आलेली आहे. मात्र त्याकडे दया याचिकेचा पर्याय शिल्लक आहे.
दोषी विनय शर्माची क्यूरेटिव पिटीशन रद्द करण्यात आलेली आहे. त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिकेसाठी अर्ज केलेला आहे. दोषी पवन गुप्ताकडे मात्र सध्या दोनीही पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे तो क्यूरेटिव पिटीशन आणि दया याचिका अशा दोनीही गोष्टीद्वारे याचिका करू शकतो.

74 ते 75 दिवस आणखी लागणार
या प्रकरणी निर्भयाचे वकील जितेंद्र झा यांनी देखील सांगितले होते की, कदाचित अजून 74 ते 75 दिवस लागू शकतात. नवीन डेथ वॉरंट जरी निघाले असले तरी 31 जानेवारीला बारा वाजण्याच्या आधी जर कोणी राष्ट्रपतींकडे याचिका दाखल केली तरी ही फाशी पुढे जाऊ शकते.

काय घडले होते नेमके त्या दिवशी
डिसेंबर 2012 मध्ये, एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर रॉडने हल्ला केला गेला होता. विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी नेण्यात आले होते, तेव्हा तिचा 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता. याबाबत सहा आरोपी होते त्यातील एक नाबालिक असल्यामुळे त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली तर एकाने जेलमध्येच आत्महत्या केली. तर बाकी चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे