निर्भया केस : जर आम्हाला फाशी देऊन बलात्कार थांंबणार असतील तर लटकवा आम्हाला – दोषी विनय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी फाशी टाळण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गांचा वापर करत आहेत. ते सतत हे बोलत आहेत की त्यांना फाशी देऊन काहीही बदलणार नाही. एका वृत्तानुसार, निर्भयाच्या दोषींपैकी विनयने तिहार तुरुंगातील अधिकाऱ्याला सांगितले की त्यांना फाशी दिल्याने बलात्कार थांबणार असतील तर त्यांना शिक्षा द्या.

वृत्तानुसार, दोषी विनय म्हणाला, जर आम्हाला फाशी दिल्याने देशात बलात्कार थांबणार असतील. तर आम्हाला फासावर लटकवा. परंतु हे बलात्कार थांबणार नाहीत. वृत्तानुसार अधिकाऱ्याने सांगितले की मुकेशला सोडून आणखी कोणत्याही दोषीच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना वाटले नाही की त्यांंना 1 दिवसानंतर फाशी होणार आहे.

अक्षयचे घरचे अद्याप त्याला भेटायला आले नाहीत –
निर्भयाच्या चारही दोषींना 20 मार्चला फाशी होणार आहे. तिहार तुरुंग प्रशासनाने याची तयारी केली आहे. त्यासाठी पवन जल्लादला तिहारमध्ये बोलावण्यात आले आहे. 18 मार्चला डमी फाशी झाली.
वृत्तानुसार, चार दोषींपैकी अक्षयचे नातेवाईक अद्याप त्याला भेटायला आलेले नाहीत. गुरुवारी अक्षयचे नातेवाईक आले तर त्यांना भेटू दिले जाईल. गुरुवारी दुपारी 12 पर्यंतच कोणत्याही कायदेशीर पद्धतीचा विचार केला जाईल. मुकेश, विनयच्या नातेवाईकांनी त्यांची भेट घेतली आहे.