निर्भयाच्या गावातील लोकांना ‘राग’ अनावर, दोषींच्या पुतळ्यांना दिली ‘फाशी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील 4 ही दोषींची फाशी पुन्हा टळली आहे. न्यायालयाकडून आता पुढील आदेशापर्यंत फाशी रोखण्यात आली आहे. तारखांवर तारखा मिळत असल्याने देशातील अनेक लोक संतप्त झाले आहेत. फाशी पुढे ढकलण्यात आल्याचे पडसाद निर्भयाच्या वडीलांच्या गावात बरेलीमध्ये देखील उमटले.

बरेलीच्या लोकांनी या निर्णयानंतर खाप पंचायत बोलावली. पंचायतमध्ये झालेल्या निर्णयानुसार गावकऱ्यांनी 3 मार्च ही जी दोषींच्या फाशीची तारीख निश्चित झाली होती, त्याच दिवशी निर्भयाच्या चारही दोषींचे प्रतिकात्मक पुतळे तयार करुन त्यांनी प्रतिकात्मक फाशी दिली.

गावकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणले की त्यांना निर्भयाच्या दोषींची फाशी टाळल्या गेल्याने दु:ख झाले आहे. गावकरी म्हणाले की आम्हाला न्यायालयाकडून आणि सरकारकडून अपेक्षा होती की निर्भयांच्या दोषींना 3 मार्चला फाशी देण्यात येईल, परंतु ती रोखण्यात आली. न्यायालयाने सरकारने फाशी टाळली असेल परंतु आम्ही निर्णय घेतला आहे. त्यानुसार आम्ही या दोषींना प्रतिकात्मक फाशी दिली आहे.

सरकार या हीन कृत्य केलेल्या दोषींना बंद खोलीत फाशी देते परंतु आमचे मत आहे की असे घाणेरडे कृत्य करणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी द्यायला हवी असेही गावकरी म्हणाले.

निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीला पुन्हा स्थगिती मिळाली आहे. पटियाला न्यायालयाच्या निर्णयानंतर फाशी तिसऱ्यांदा लांबणीवर पडली आहे. पटिलाया हाऊस न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत चारही दोषींची फाशी रोखली आहे. न्यायालयाने दोषींच्या विरोधात काढण्यात आलेल्या डेथ वारंटला स्थगिती दिली.