निर्भया केस : दोषी असलेल्या ‘दरिंदा’ विनयनं जेलमध्ये लिहिली ‘डायरी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाला हादरून सोडणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी तिहार तुरुंगात आहेत. तिहार तुरुंग प्रशासनाने निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींच्या विविध वस्तू वकीलांकडे सुपूर्द केल्या आहेत. दोषींची बाजू लढणारे वकील ए.पी. सिंह यांनी सांगितल्यानुसार दोषींच्या काही वस्तू या शनिवारी रात्री देण्यात आल्या. मात्र दोषी विनय शर्माची डायरी अद्याप देण्यात आलेली नाही.

वकीलांच्या म्हणण्यानुसार ही डायरी 160 पानी असून त्याचा मेडिकल रिपोर्टही अद्याप देण्यात आलेला नाही. विनय याची तब्येत बरी नसून त्याला तुरुंगात विष दिल्याचा आरोप दोषींच्या वकीलाने केला आहे. विनयचा हात फ्रॅक्चर झाला असून तो मागील सात दिवसांपासून उपोषण करीत आहेत. यासंदर्भात मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर नेमकं स्पष्ट होईल.

दोषींच्या वकीलांनी कोर्टाला सांगितले
दोषीच्या वकीलांनी पतियाळा हाऊस कोर्टासमोर दाखल केलेल्या याचिकेत विनय शर्माच्या दया याचिका आणि विनय शर्मा, पवन कुमार गुप्ता आणि अक्षय कुमार सिंह यांच्या कागदपत्रांची विनंती करण्याबाबत तातडीने कोर्टाचे आदेश मागितले आहेत. अहवालानुसार, दोषींच्या अर्जात म्हटले आहे की, बऱ्याच विनंत्या करूनही शर्माला दोषी ठरवण्यासंबंधित कागदपत्रे पुरवली गेली नाही. आता संबंधित तरूंगातील अधीक्षकांकडून पवन गुप्ता आणि अक्षय ठाकूरला अशीच कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या सुचना देण्यात याव्यात.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like