निर्भया गँगरेप ! आज संपणार मारेकर्‍यांची ‘मुदत’, काही दिवसानंतर जारी होणार ‘डेथ वॉरंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या निर्भया केसमधील गुन्हेगारांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र त्यावर अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. गुन्हेगारांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती आणि राष्ट्रपतींकडे दयेसाठी अर्ज करण्यासाठी सांगिलते होते. मात्र ही मुदत आज म्हणजेच सोमवार अखेर संपुष्टात येत आहे.

काय म्हणाले तिहार जेलचे अधिकारी –

तिहारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फाशीपासून वाचण्यासाठी या गुन्हेगारांनी सर्व मार्गांचा वापर केलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे फक्त राष्ट्रपतींकडे दया याचिका करणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध आहे. 29 ऑक्टोबर रोजी जेल अधिकाऱ्यांनी याबाबतची कल्पना चारही गुन्हेगारांना दिली आणि नोटीस मिळाल्यानंतर पुढील सात दिवसांमध्ये राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याची मुदत असेल असेही सांगण्यात आले. तसेच सात दिवसानंतर याबाबत काही प्रतीउत्तर न आल्यास पुढील सरकारी कारवाई सुरु केली जाईल.

चालत्या बसमध्ये दिल्लीमध्ये सहा जणांनी एका मुलीवर निघृण पद्धतीने बलात्कार केला होता. त्यानंतर काही दिवसातच त्या मुलीचा मृत्यू झाला होता. देशभरातून या कृत्याबाबत संताप व्यक्त केला गेला होता. यातील एका आरोपीने जेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तर एका नाबालिक मुलाला बालसुधार गृहात राहण्याची शिक्षा देण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने 9 जुलै रोजी यातील दोषी मुकेश (31), पवन गुप्ता (24) आणि विनय शर्मा (25) यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यांना देण्यात आलेल्या फाशीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी ही याचिका केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही शिक्षा कायम ठेवली आहे. तर यातील अक्षय कुमार सिंह (33) या चवथ्या आरोपीने आपल्या शिक्षेवर पुनर्विचार करावा यासाठी कोणतीही याचिका दाखल केलेली नाही.

Visit : Policenama.com