निर्भयाच्या आजोबाचे डोळे ‘पाणावले’, 16 डिसेंबरला दोषींना फाशी दिली असती तर मिळाली असती ‘शांती’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या ‘निर्भया’ बलात्कार आणि खून खटल्यातील दोषींना अद्याप फाशी देण्यात आलेली नाही. घटनेला ७ वर्षे झाली तरीही दोषींना फाशी न दिल्याची खंत पीडितेच्या आई -वडिलांसह तिच्या आजोबांना देखील आहे. निर्भयाच्या दोषींना १६ डिसेंबर रोजी फाशी द्यावी अशी इच्छा तिच्या आजोबांनी व्यक्त केली आहे.

निर्भायाचे आजोबा लालजी सिंह म्हणाले कि, निर्भया घटनेच्या दिवशी जर सर्व दोषींना फाशी देण्यात आली तर मला खूप दिलासा मिळेल. असे झाल्यास अशा घटना घडविणाऱ्यांना सक्तीचा संदेश मिळेल आणि कोणासोबतही असे कृत्य घडणार नाही. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेता निर्भयाच्या दोषींना १६ डिसेंबरला फाशी देणे शक्य नसल्याचेही ते म्हणाले. निर्भयाचे आजोबा म्हणाले की, माझ्या मुलीच्या बाबतीत जे घडले त्यास बराच काळ लोटला आहे, परंतु आता तिच्या दोषींना शिक्षा करण्यास उशीर होऊ नये. दोषींना संबंधीत सर्व कायदेशीर अडथळे पूर्ण करून या चार आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी. घटनेला एवढी दिवस होऊनही आरोपी त्यांचे आयुष्य जगत आहे.

निर्भयाचे प्रकरण काय आहे
१६ डिसेंबरच्या रात्री निर्भया एका मित्राबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर परत येत होती. वाटेत दोघांनी मुनिरका येथून बस पकडली. त्यांच्याशिवाय या बसमध्ये ६ जण उपस्थित होते. बसमध्ये उपस्थित लोकांनी निर्भयाची छेडछाड सुरू केली. नंतर त्याने निर्भयावर बलात्कार केला, त्यानंतर तिला आणि तिच्या मित्राला जखमी अवस्थेत वसंत विहार परिसरातील चालत्या बसमधून खाली फेकले. आतड्यांमधील आणि संपूर्ण शरीरात गंभीर जखमांमुळे निर्भयाला सिंगापूरच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथेच २९ डिसेंबर रोजी रात्रीच्या वेळी तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणातील चार दोषींना विनय शर्मा, मुकेश सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुसर्‍या दोषी रामसिंगने २०१५ मध्ये तिहार तुरुंगात आत्महत्या केल्याचा आरोप आहे आणि सुधारगृहात तीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर अल्पवयीन आरोपीला २०१५ मध्ये सोडण्यात आले होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/