केजरीवालांविरोधात निवडणूक लढण्याबाबत ‘निर्भया’च्या आईनं केलं ‘हे’ मोठं विधान

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – अनेक दिवसांपासुन माध्यमांमध्ये याबाबत चर्चा होती की दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निर्भयाच्या आई आशा या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र स्वतः अशा यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडून लढवणार असल्याचे वक्तव्य फेटाळून लावले आहे. दिल्ली काँग्रेसच्या प्रमुखांनी देखील याबाबत निर्भयाच्या आई सोबत याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत बोलताना स्वतः आशा यांनी सांगितले की,राजकारणात माझी येण्याची इच्छा नाही आणि याबाबत कोणत्याही काँग्रेस नेत्याशी माझी कधीही चर्चा झालेली नाही. मी माझ्या मुलीला न्याय देण्यासाठी लढत आहे. मुलीच्या हत्याऱ्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी एवढीच माझी मागणी असल्याचे निर्भयाची आई आशा यांनी सांगितले.

डिसेंबर 2012 मध्ये, एका 23 वर्षीय पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर दिल्लीत चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिच्यावर रॉडने हल्ला केला गेला होता. विद्यार्थिनीला गंभीर अवस्थेत उपचारासाठी सिंगापूर येथे नेण्यात आले होते, तेव्हा तेथे तिचा 29 डिसेंबर रोजी मृत्यू झाला होता.

याबाबत सहा आरोपी होते त्यातील एक नाबालिक असल्यामुळे त्याला तीन वर्षाची शिक्षा झाली तर एकाने जेलमध्येच आत्महत्या केली. तर बाकी चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/