माझा सर्वोच्च न्यायालयावर ‘विश्वास’, 1 फेब्रुवारीलाच होणार सर्व दोषींना ‘फाशी’, निर्भयाच्या आईनं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भयांच्या दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावर बोलताना निर्भयांची आई आशा देवी म्हणाल्या की, त्यांना सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे की दोषींना 1 फेब्रुवारीला फाशीची शिक्षा होईल. दोषी अक्षयने क्यूरेटिव्ह याचिका दाखल केली होती. तर दोषी मुकेशने राष्ट्रपती द्वारे दया याचिका रद्द केल्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर बुधवारी निर्णय आला. सर्वोच्च न्यायालयाने मुकेशची याचिका फेटाळली. यावर बोलताना आशा देवी म्हणाल्या की इतर दोषींची याचिका रद्द होईल यावर मला विश्वास आहे. मला न्याय मिळेल अशी ही अपेक्षा आहे. त्या म्हणाल्या की दोषींना कायद्याचा आधिकार आहे, परंतु त्याचा गैरवापर होत आहे, न्यायालयाने यावर बंदी आणली पाहिजे.

दोषींकडून फाशी टाळण्याचा प्रयत्न –
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणीतील दोशी फाशी टाळण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. मुकेशने तिहार तुरुंगात लैंगिक शोषण झाल्याचा आरोप लावला होता. माहिती मिळत आहे की अक्षयनंतर आता दोषी विनय देखील राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठण्याच्या तयारीत आहे. दिल्लीमध्ये 2012 साली निर्भयाचा सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी 4 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

निर्भयाची आई आशा देवी फाशी देण्यास उशीर होत आहे या कारणाने नाराज आहे. दोषींच्या वकीलांद्वारे फाशी देण्यात उशीर होत असल्याने सरकारवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सरकारने मुकेशच्या याचिकेला विरोध केला होता. सरकारच्या पक्षाचे म्हणणे आहे की ही याचिका स्वीकारण्यालायक नाही. त्यांचे म्हणणे आहे की राष्ट्रपतींद्वारे दया याचिकेवर निर्णय आल्यानंतर त्यावर समीक्षा करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे सीमित आधिकार आहेत.

फक्त न्यायालयात जाण्याचा निर्णय बाकी –
दोषी मुकेश सिंह याची पुनर्विचार याचिका, क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका रद्दबातल ठरवली आहे. राष्ट्रपतींद्वारे दया याचिका रद्द केल्यानंतर दोषी मुकेशकडे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्याय होता, ज्यावर आज निर्णय होऊ शकतो.

फेसबुक पेज लाईक करा