निर्भया केस : ‘मान’ मोडल्यानं झाला 4 दोषींचा मृत्यू, फासावर लटकावल्यानंतर बराच वेळ धडकत होतं त्यांचं ‘हृदय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया गँगरेप आणि खून प्रकरणातील चार दोषी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि अक्षय कुमार सिंह यांना शुक्रवारी (दि.20) पहाटे फाशी देण्यात आली. चौघांना फाशी दिल्यानंतर सात वर्षे चाललेल्या प्रकरणाचा शेवट होऊन यातील पीडित नर्भयाला न्याय मिळाला. निर्भया प्रकरण समोर आल्यानंतर या विरोधात देशातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. घटनेचे गांर्भीय ओळखून सरकारने कडक कायदा बनवला होता.

शेवटची देवपूजा
फाशी देण्याच्या आदल्या रात्री चारही आरोपींना झोप आली नाही. फाशीच्या आगोदर आरोपींना काही खाणार का अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी नकार दिला. दोषींनी काळे कपडे घालण्यास दिले. दोषींनी काळे कपडे घातल्यानंतर तुरुंग अधिकाऱ्यांनी तुम्हाला तुमच्या देवाचे शेवटचे स्मरण करायचे असेल तर करून घ्या असे सांगितले. चारही आरोपींनी शेवटचे देवाचे स्मरण केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. चौघांना फाशीची ऑर्डर वाचून दाखवल्यानंतर त्यांना काही वेळासाठी एकटे सोडण्यात आले.

एका क्षणात गेले प्राण
आरोपींना फाशी दिल्यावर ते तडफडतील असे वाटले होते मात्र असे काही झाले नाही. फासावर लटकवल्यानंतर त्यांचे एका क्षणाच प्राण गेले. फाशी दिल्यानंतर 35 मिनिटे त्यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले. तुरुंग प्रशासनाच्या वेळेपेक्षा 5 मिनिटे अधिक होते. या नंतर त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात घेवून जाण्यात आले.

लोकांची घोषणाबाजी
शुक्रवारी पहाटे साडपाच वाजता निर्भया प्रकरणातील चार दोषींना तुरुंगातील क्रमांक तीनच्या आत बनविण्यात आलेल्या फाशीच्या कोठडीत आणण्यात आले. या ठिकाणी त्यांना फासावर लटकवण्यात आले. दोषींना फासावर लटकवल्यानंतर तिहार तुरुंगाबाहेर जमलेल्या नागरिकांनी तिरंगा फडकवत घोषणाबाजी केली. निर्भया अमर रहे, भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

डॉक्टरांच्या पॅनलचे प्रमुख आणि दीन दयाल उपाध्याय हॉस्पिटलमधील फॉरेन्सिक सायन्स विभागाचे प्रमुख डॉ. बी.एन मिश्रा यांनी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्णे केली. यानंतर त्यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, सध्यातरी याबाबत बोलणे उचीत नाही. तरीही शवविच्छेदनामध्ये चौघांच्या मानेचे हाड मोडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एखादा प्रोफेशनल जल्लाद ज्यावेळी गळ्यात फाशीचा दोर घालून आवळतो त्याचवेळी अशा प्रकारे मृत्यू होतो. त्यांच्या मानेचे हाड मोडल्यानंतर देखील त्यांचे हृदय बराचवेळ सुरु होते.