दिल्लीतील ‘निर्भया’च्या बलात्काऱ्यांना लवकरच फाशी, गृह मंत्रालयाने फेटाळला ‘दये’चा अर्ज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातील दोषीने केलेला दयेचा अर्ज फेटाळण्याची शिफारस केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शुक्रवारी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपतीही दयेचा अर्ज फेटाळतील, असे आता स्पष्ट झाले आहे.

हैदराबाद येथील महिला डॉक्टरावर बलात्कार करुन तिला पेटवून देऊन जीवंत जाळणाऱ्या चार नराधमांना पोलिसांनी शुक्रवारी पहाटे एन्काऊंटर केला होता. त्याचे देशभरातून स्वागत होत आहे. त्याचवेळी दिल्लीतील निर्भयाच्या बलात्काऱ्यांना कधी फाशी देणार हा प्रश्न उपस्थित केला गेला. हैदराबादच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील निर्भया प्रकरणातील दोषींचा दयेचा अर्ज फेटाळला असून तशी शिफारस राष्ट्रपतींना केली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारीच राजस्थानमध्ये बोलताना पास्को कायद्याखालील गुन्ह्यातील आरोपींना दया दाखवून नये, असे सांगितले होते. त्यामुळे गृह मंत्रालयाची शिफारस स्वीकारुन ते या आरोपींचा दयेचा अर्ज फेटाळून लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निर्भयाच्या आरोपींना लवकरच फाशी होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like