बागेत फिरणाऱ्या प्रेमी युगुलांवर ‘निर्भया’चा वॉच

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईन

युवती, महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी प्रेमी युगुलांचा वाढलेला बीभत्स वावर याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांच्या पथकाने कारवाईची लाठी उगारली आहे. प्रेमी युगुले फिरणार्‍या ठिकाणी विशेषतः आमराई परिसरावर या निर्भया पथकाने चांगलाच वॉच ठेवला आहे. अनेक युगुलांना या पथकाने लाठीचा प्रसादही दिला आहे.

आमराईसह शहरातील उद्यानांमध्ये विसाव्यासाठी नागरिक, महिला, मुले जात असतात. काही काळ मनोरंजन व्हावे यासाठीही काही पालक मुलांना घेऊन जात असतात. मात्र प्रेमी युगुलांच्या विविध प्रकारच्या चाळ्यांमुळे अशा ठिकाणी जाणार्‍या पालकांसह मुलांना त्रास वाढला आहे. त्यामुळे काही नागरिकांनी थेट पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडेच तक्रारी केल्या आहेत. अधीक्षक शर्मा यांनी निर्भया पथकाला यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
[amazon_link asins=’B07CK51LT9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’85a654f0-ce3c-11e8-b950-87ea90880663′]
त्यामुळे आता निर्भया पथकाने महाविद्यालये, शाळा यासह आमराई, उद्याने या परिसरातील  वॉच वाढवला आहे. त्यामुळे विविध चाळे करणार्‍या युगुलांना शोधून काढून त्यांना तेथेच लाठीचा प्रसाद पथकाकडून देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे् अन्वेषणच्या पथकाने विविध महाविद्यालयात जाऊन तेथील टवाळखोरांना चोप दिला होता. आता निर्भया पथकाने चाळे करणार्‍या युगुलांना टार्गेट केले असून पथकाने आमराईसह उद्यानांमध्ये वॉच ठेवला आहे.