भाजपला सत्तेतून घालवल्या शिवाय राहणार नाही ; मुंडेंची सिंहगर्जना

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – आमच्या हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला अशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर चालू होत्या. वातावरण खराब असल्याने आम्हाला सभेच्या ठिकाणी यायला वेळ झाला. आमचे हेलिकॉप्टर भरकटले अशी बातमी ऐकून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना मजा वाटली असेल पण आम्ही एवढे निबर आहोत कि तुम्हाला सत्तेतून घालवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही अशी सिंहगर्जना विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

दिवसा ढवळ्या मोदी सरकारने आपली लूट सुरु केली आहे. या लुटीच्या विरोधातच राष्ट्रवादी काँग्रेसने निर्धार परिवर्तन यात्रा आरंभली आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हणले आहे. तुम्ही आम्हाला साथ द्या परिवर्तन नक्की होईल असा विश्वास हि धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

मी पुराव्या निशी १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटी रुपयांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. मात्र त्यांच्यावर सरकार चौकशी देखील करायला तयार नाही आहे. तर पाच मंत्री पदासाठी स्वाभिमानी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना लाचार झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेला महाराष्ट्रात परिवर्तन नक्की होणार त्या परिवर्तनाच्या लढाईत तुम्ही सहभागी व्हा असे आवाहन धनंजय मुंडे यांनी राज्यातील जनतेला कोल्हापूर मधून केले आहे.

राष्ट्रवादीच्या या तिसऱ्या टप्प्यातील निर्धार परिवर्तन यात्रेला राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते.

सवर्ण आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ‘ही’ आठ कागदपत्रे महत्वाची
काँग्रेसच्या ‘या’ ज्येष्ठ माजी मंत्र्याचे महिलेशी गैरवर्तन; व्हीडिओ व्हायरल
तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीमाना देईल
राष्ट्रवादीला धक्का : ‘या’ माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश

Loading...
You might also like