Job Alert ! बारावी पास असणाऱ्यांनाही मिळणार सरकारी नोकरी; ‘या’ विभागात निघाली मेगा भरती

नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. ती मिळवण्यासाठी अनेकजण झटत असतात. मात्र, काहींना मिळते तर काहींना नोकरी मिळत नाही. पण आता ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलप्मेंट अँड पंचायती राज’ (NIRDPR) ने 500 पेक्षा जास्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार NIRDPR कडून भरती केली जाणार आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रताही जास्त नाही.

NIRDPR च्या विभागात नोकरी मिळण्यासाठी बारावी पास असणे गरजेचे आहे. बारावी पास उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये यंग फेलो, क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन आणि स्टेट प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर या पदांची भरती केली जाणार आहे.

पदांची माहिती

– स्टेट प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – 10 पदे

– यंग फेलो – 250 पदे

– क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 250 पदे

– एकूण पदे – 510

पात्रता आणि वयोमर्यादा

स्टेट प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – अर्थशास्त्र विषयासह सोशल सायन्समध्ये 2 वर्षांची पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री / रूरल डेवलपमेंट / रूरल मॅनेजमेंट / राज्यशास्त्र/ समाजशास्त्र / एंथ्रोपोलॉजी / सामाजिककार्य /विकास अध्ययन / इतिहास आणि समकक्ष योग्यता. या भरतीसाठी 30 वर्षांपासून 50 वर्षा पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.

यंग फेलो – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/अर्थशास्त्र विषयासह सोशल सायन्समध्ये 2 वर्षांचा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा / रूरल डेवलपमेंट / रूरल मॅनेजमेंट / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / मानव विज्ञान / सामाजिक कार्य / विकास अध्ययन / इतिहास आणि समकक्ष योग्यता. या पदासाठी 21 ते 30 वर्ष.

क्लस्टर लेवल रिसोर्स पर्सन – या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाची 12 वी पास होणे अनिवार्य. 25 ते 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
वेतनमान

– स्टेट प्रोग्राम को-ऑर्डिनेटर – 55,000 रुपये प्रति महिना

– यंग फेलो – 35,000 रुपये प्रति महिना

– क्लस्टर लेव्हल रिसोर्स पर्सन – 12,500 रुपये प्रति महिना

अर्ज शुल्क – या पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नसेल.