‘या’ अभिनेत्यानं PM मोदींकडे केली मोठी मागणी, म्हणाला – ‘देशातील गद्दारांवर करा सर्जिकल स्टाइक’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – तबलिगी जमातीच्या मरकज या कार्यक्रमात कोरोनाची लागण झालेले काही रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे यातील काही रुग्णांवर गाझियाबादमधील एमएमजी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र या रुग्णांनी रुग्णालयातील प्रशासनासोबत गैरवर्तन केल्यामुळे भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव निरहुआ याने संताप व्यक्त केला आहे. ‘देशात राहून अशा कारवाया करणार्‍यावर सर्जिकल स्टाइक करण्याची गरज आहे, असे त्याने म्हटले आहे.

दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या मरकज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये असंख्य लोकांनी उपस्थिती दर्शविली होती.मात्र या कार्यक्रमानंतर कोरोनाचा फैलाव वाढल्याचे निदर्शनास आले होते. मात्र या रुग्णांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांसोबत गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच निरहुआ याने कवितेच्या माध्यमातून त्याचा संताप व्यक्त केला आहे. ‘देशात राहून बेइमानी करणार्‍यांवर सर्जिकल स्ट्राइक करायला हवा’, अशी मागणी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.राग अनावर झाल्यामुळे निरहुआने कवितेच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या आहेत. ही कविता त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केली असून सध्या ती चांगलीच व्हायरल होत आहे. तबलिगी जमातचा हा कार्यक्रम मात्र दिल्लीत पार पडला.

या कार्यक्रमाला 2500 लोक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजर राहिलेल्या अनेकांचा कोरोना व्हायरसची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. तर हजारो लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या अनेकांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतील निझामुद्दीन हे ठिकाण कोरोनाचे हॉटस्पॉट झाले असून 2000 लोकांना यामुळे करोनाची लागण झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारे या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांना पुढे येऊन माहिती द्यावी असे आवाहन केले आहे.