विधायक ! ‘निर्मल वारी’तून दृढ होतोय स्वच्छतेचा संकल्प !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंढरीच्या वाटेवर वर्षेनुवर्षे वारी करणाऱ्या वारकरी बांधव -भगिनींना आता स्वच्छतेचे महत्व पटले आहे. गेली चार – पाच वर्षे स्वयंसेवकांनी घेतलेले अथक परिश्रम आणि जनजागृतीमुळे आता निर्मल वारी उपक्रम यशस्वी ठरला आहे . अनेक गावांनीही स्वच्छतेची कास धरली आहे. शासनानेही तात्पुरती आणि फिरती शौचालये तसेच संबंधित यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून दिल्याने स्वच्छतेसाठी आपुलकीची ‘सक्ती’ हीच विठू भक्ती याचा प्रत्यय मिळत आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज आणि संतशिरोमणी तुकाराममहाराज पालखी सोहळय़ामध्ये ‘निर्मल वारी अभियान’ राबविण्याचा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे. मात्र सुरुवातीला उपक्रमासाठी कोणते अडथळे आले, गावांचा प्रतिसाद कसा होता, ग्रामस्थांची भूमिका काय होती याबाबत या उपक्रमात प्रारंभीपासून अग्रेसर असणारे भाजपचे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे उपाध्यक्ष वसंत उर्फ बाळासाहेब अमराळे म्हणाले कि यवत आणि लोणी गावांमध्ये या निर्मल वारीचा प्रयोग करण्याचे पाच वर्षांपूर्वी माजी खासदार प्रदीप रावत आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून ठरले. मोतीबागेत तत्कालीन प्रांत कार्यवाह अतुल लिमये आणि मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात लोणी व यवत गावात प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवायचे ठरले. त्यासाठी खर्चही विभागून जबाबदारी निश्चित करण्यात आली.

त्यानंतर प्रारंभी आम्ही या गावांमध्ये दहा महिने वारंवार बैठका घेतल्या आणि एकमत घडवून आणले. वारीदरम्यान वारकरी प्रातर्विधीसाठी कोणत्या ठिकाणी जातात ती ठिकाणे निश्चित केली आणि त्या ठिकाणी तात्पुरते शौचालये उभारून त्याचा वापर करण्यास उद्युक्त केले. या गावांमध्ये आम्ही पुण्यातील शंभर महिला आणि शंभर पुरुष, कार्यकर्ते थांबून रात्री बारा पासून ते पहाटेपर्यंत गस्त घालत होतो. प्रारंभी ग्रामस्थांनी राजकीय दृष्टिकोनातून या उपक्रमाकडे पाहिले आणि आमच्या भूमिकेवर संशय घेतला. मात्र ही संकल्पना सर्वांच्या आरोग्यासाठी आधारवड ठरत असल्याने आज ही चळवळ दिशादर्शक ठरली आहे.या आदर्शवत उपक्रमामध्ये लोणी या गावात सहभागी होणाऱ्या सर्वांचा दरवर्षी नित्यनेमाने गौरवही करण्यात येतो. परिणामी या उपक्रमांत सहभागी होणाऱ्यांची संख्या आता वाढत आहे आणि खऱ्या अर्थाने ‘निर्मल वारी’चा हा प्रयोग व्यापक झाला आहे.

सलग पाच वर्षे लोणी या गावाची गावप्रमुख म्हणून माझ्याकडे जबाबदारी असून मागील २०१८ साली हे गाव शंभर टक्के स्वच्छ ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो याचेच आम्हाला समाधान आहे असेही बाळासाहेब अमराळे यांनी नमूद केले.

शरीरा तील विषारी घटक बाहेर टाकणे आवश्यक, करा हे उपाय

शारीरीक दुर्बलता दूर करण्यासाठी पुरुषांनी कांद्या चा असा करावा उपयोग

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

शारीरीक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत चिकित्सा ठरते उपयोगी