नाशिकमध्ये काँग्रेसला ‘खिंडार’, आमदार निर्मला गावित करणार ‘शिवसेनत’ प्रवेश

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार निर्मला गावित यांनी काँग्रेसचा हात सोडून हातात धनुष्यबाण घेणार आहेत. निर्मला गावित या काँग्रेसच्या इगतपूरीतील आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गावित लवकर शिवसेनेत प्रवेश करण्याचा तयारीत आहेत. विधानसभा निवडणूकांआधीच काँग्रेसला राज्यात गळती लागली आहे.

निर्मला गावित या काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास काँग्रेसला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागू शकते. सध्या जिल्हातील अनेक राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या वाटेवर आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीआधी नाशिकमध्ये आघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीचे आमदार धनराज महाले यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. महाले यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि संजय राऊत त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत घरवापसी केली. धनराज महालेंच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शकता आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like