पुणे जि.प.च्या अध्यक्षपदासाठी निर्मला पानसरे आणि उपाध्यक्षपदासाठी रणजित शिवतरेंच्या नावावर ‘शिक्कामोर्तब’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपसाठी आज निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार हे निश्चित आहे. या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीला स्वबळावर बहुमत मिळालेले आहे. अशातच राष्ट्रवादी कडून अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपदासाठी कुणाला संधी दिली जाणार याची उत्सुकता होती. अखेर ही नावे जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी निर्मला पानसरे आणि उपाध्यक्षपदासाठी रणजित शिवतरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव आहे. अध्यक्षपद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल रात्री इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतीत 17 महिलांनी मुलाखती दिल्या होत्या. अखेर आज निर्मला पानसरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपदासाठी मोठी रस्सीखेच होती. मावळमधून शोभा कदम, फुरसुंगीमधून अर्चना कामठे, शिरुरमधून मंगलदास बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल, सुजाता पवार, स्वाती पाचुडंकर, खेडमधून निर्मला पानसरे यांच्यात अध्यक्षपदासाठी स्पर्धा होती. मात्र, अजित पवार यांनी निर्मला पानसरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

पुणे जिल्हा परिषदेतील संख्याबळ
एकूण जागा – 75
राष्ट्रवादी – 42 (3 सहयोगी)
शिवसेना – 14
काँग्रेस – 7
भाजप – 7
रासप – 1
रोहित पवार हे आमदार झाल्याने एक पद रिक्त झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/