ग्रामीण भागात सणांच्या हंगामात जास्तीचे कर्जवाटप व्हावे : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी खासगी क्षेत्रातील बँका, एनबीएफसी आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांशी भेट घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण म्हणाल्या की वित्तीय संस्थांसमोर तरलपणाची (रोख पैशांची) कोणतीही समस्या नाही. तसेच यावेळी त्यांनी नवरात्र, दिवाळी या सणासुदीच्या हंगामात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्याचे निर्देश दिले आहे.

कर्ज मेळाव्यात खासगी बँकादेखील सहभागी होतील
 बैठकीत बँकांनी तरलतेचा मुद्दा उपस्थित केला नाही त्यामुळे रोख पैशांची समस्या सध्या तरी दिसत नसल्याचे समजले. यावेळी अर्थमंत्री म्हणाल्या की ग्रामीण भागात कर्जाची मोठी मागणी आहे. यामुळे ग्रामीण भागातील लोण मेळावा सरकार आयोजित करणार असून खासगी बँकासुद्धा कर्ज मेळ्यात सहभागी होतील. सणासुदीच्या हंगामात कर्जाची सहज उपलब्धता व्हावी यासाठी सरकार ३ ऑक्टोबरपासून देशभरातील ४०० जिल्ह्यांमध्ये कर्ज फेरी आयोजित करणार आहे.

रोख पैसे वाढविण्यावर भर द्या :
याच महिन्यात, सीतारमण यांनी सांगितले होते की, सणासुदीच्या कालावधीत, बँकांकडून एनबीएफसी आणि ग्राहकांकडे जास्तीत जास्त कर्जवाटप आणि रोख प्रवाहाची गती गतीमान व्हावी ही सरकारची इच्छा आहे.

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सतत घोषणा :
यापूर्वी शुक्रवारी आपल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट क्षेत्रासाठी अनेक मोठ्या गिफ्टची घोषणा केली होती. या दरम्यान त्या म्हणाल्या होते की देशांतर्गत कंपन्यांकडून कोणतीही सूट न घेता २२% मिळकत कर आकारला जाईल. त्याच वेळी अधिभार आणि उपकर जोडल्यानंतर कंपनीला २५.१४ टक्के कर भरावा लागेल. याचा फायदा देशातील बड्या कंपन्यांना होईल ज्या ३०% कॉर्पोरेट टॅक्स स्लॅबमध्ये येतात.