खुशखबर ! मोदी सरकारकडून कँप लावून दिलं जाणार कर्ज, ‘खासदार’ राहतील ‘साक्षीदार’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी म्हटलं की, 31 मार्च 2020 पर्यंत कोणत्याही एमएसएमईला एनपीए घोषित केलं जाणार नाही. त्यांनी बँकांसोबतच चलनाचाही आढावा घेतला.

नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या(NBFC) च्या स्थितीत सुधारणा –

पत्रकार परिषदेत अर्थ मंत्री सीतारामन म्हणाल्या, “नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या(NBFC) समोर आल्या आहेत ज्यांना बँक कर्ज देऊ शकते. बँक लँडिंगसाठी नवीन ग्राहक जोडले जातील.” सीतारमण यांच्या मते NBFCच्या स्थितीत सुधारणा झाली आहे.

अर्थव्यवस्था में जान फूंकने की एक और कोशिश

200 जिल्ह्यात लागणार कँप

निर्मला सीतारामन म्हणाल्या, “बँक कर्ज देण्याच्या हेतूने 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान 200 जिल्ह्यात एनबीएफसी आणि किरकोळ कर्जदारांसाठी कँप लावणार आहे. सरकारने या मोहिमेला बँक लोन मेला असे नाव दिले आहे.” अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले, “11 ऑक्टोबर नंतर लोन मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे.”

खास बात अशी की, ज्या जिल्ह्यात हा मेळावा लागणार आहे, तेथील खासदारही या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी या मोहिमेत भाग घेणार आहेत. मंदीची चाहूल असताना मोदी सरकार वारंवार मोठ्या घोषणा करत आहे.

अर्थव्यवस्थेत वारंवार सुधारणा करण्यासाठी प्रयत्न

यापूर्वी शनिवारी अर्थमंत्र्यांनी 60 टक्के बांधकाम पूर्ण केलेल्या निवासी प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांची विशेष सुविधा जाहीर केली. तसेच ही रक्कम खासगी क्षेत्रातून उभी केली जाईल याचीही माहिती दिली.

Visit – policenama.com 

You might also like