बँकेच्या कामकाजाला वैतागून व्यापार्‍यानं केली ‘तक्रार’, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उचललं ‘हे’ पाऊल

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सरकार नेहमीच व्यापाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आलेले आहे. सरकरने अनेक छोट्या मोठ्या योजना देखील व्यापाऱ्यांसाठी सुरु केलेल्या आहेत. नुकतेच निर्मला सीतारमन यांनी एक ट्विट करून मदत मागितलेल्या व्यापाऱ्याला सहायता करण्याचा भरोसा दिला आहे.

सीतारमन यांनी मागितली माफी
संजय पटेल या छोट्या व्यापाऱ्याने बँकेला वैतागून निर्मला सीतारमन यांना टॅग करत ट्विटरवर त्यांच्याकडून मदत मागितली होती. त्यांच्या ट्विटनंतर सीतारमन यांनी व्यापाऱ्याला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आणि त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

व्यापारी संजय पटेल यांनी केले होते ट्विट
व्यापारी संजय पटेल यांनी तेरा फेब्रुवारी रोजी अर्थ मंत्रालयाला टॅग करत एक ट्विट करत म्हंटले होते की सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यांच्या घराचे कागदपत्र देत नाही. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी कर्जाची सर्व रक्कम चुकती केली आहे. आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी खाजगी प्रॉपर्टी देखील विकल्याचे सांगितले. तसेच ट्विटमध्ये त्यांनी आमची मदत करा असे देखील आवाहन केले होते.

त्यानंतर अर्थ मंत्रालयाने त्यांना उत्तर दिले, आम्हाला देखील खूप दुःख झाले अर्थ मंत्रालय याबाबत तुमच्याशी नक्की बोलले.

व्यापार सुधारणेमध्ये भारत 63 व्या स्थानावर
सरकार देशात व्यापार सुधारावा यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. वल्ड बँकेच्या जागतिक व्यापार सुधारणा रँकिंगमध्ये भारत 2020 मध्ये 14 क्रमांकांनी सरशी मिळवलेली आहे. सध्या या क्रमवारीत भारत 63 व्या स्थानावर आहे. त्यातच सौदी अरेबिया 62 व्या आणि यूक्रेन 64 व्या स्थानी आहे. या यादीमध्ये कोणतेही चार मुद्दे लक्षात घेऊन देशांना रँकिंग दिले जाते.

You might also like