दुसऱ्यांना ‘चोर’ म्हणणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवला : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुसऱ्यांना चोर म्हणणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी यांना लगावला. राहूल गांधी हे दुसऱ्यांना चोर म्हणण्यात माहीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील प्राप्तिकर आणि जीएसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर प्रासारमाध्यमांशी बोलताना निर्मला सितारामन राहूल गांधीवर टीका केली.

आरबीआयने सरकारला दिलेल्या निधीबाबत प्रश्न उपस्थित करणे चुकीचे असल्याचे सांगत सरकारला किती निधी द्यायाच याचा निर्णय आरबीआयने समिती नेमून घेतला आहे. समितीच्या एकूण सात बैठकांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आरबीआयचे माजी गव्हर्नर बिमल जालान या समितीचे अध्यक्ष होते. त्यामुळे यावर प्रश्न उपस्थित करणे गैर असल्याचे सितारामन यांनी म्हटले आहे. काँग्रेस कडून आरबीआयच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणे हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आरबीआयच्या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित करणे किंवा त्याला चोरी म्हणणे योग्य नसल्याचे सांगत आरबीआयची प्रतिमी मलिन करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, आरबीआयने दिलेल्या निधीचा उपयोग कोणत्या कारणासाठी करणार असा प्रश्न सितारामन यांना दिल्लीमध्ये पत्रकारांनी विचारला होता. यावेळी त्यांनी प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळून प्रश्नाला बगल दिली. या पैशांचा वापर कशासाठी केला जाणार आहे हे आत्ताच सांगता येणार नाही. याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी म्हटले होते.

आरोग्यविषयक वृत्त –