इंदिरा गांधी नंतर पहिल्यांदाच एक महिला सादर करणार अर्थसंकल्प ; अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पात ‘या’ गोष्टींवर ‘नजर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या ५ जुलै रोजी ११ वाजता मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करतील. देशाच्या पहिला महिला पंतप्रधान आणि अर्थमंत्री इंदिरा गांधी यांच्यानंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या दुसऱ्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. काहीशा मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देणे, रोजगारनिर्मिती व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या आव्हानांचा सामना करण्यासाठी अर्थसंकल्पात उपाययोजना केल्या जातील. २०१४ पेक्षा अधिक बहुमताने निवडून आलेल्या मोदी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

५ वर्षांपासून खालच्या स्तरावर आहे अर्थव्यवस्था
सरकारला GDP वाढविण्यासाठी मोठे पाऊल उचलावे लागतील. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात GDP ५.८ % होता. पाच वर्षातील हा सर्वात कमी दर आहे. या दरामुळे भारत चीनपेक्षा वेगाने वाढत असलेल्या अर्थव्यवस्थेचा दर्जा गमावून बसली होती. या दरम्यान चीनचा GDP ६.४% होता.

वाढवावे लागेल कर संकलन
वित्तीय वर्ष २०१८-१९ च्या तुलनेत एकूण कर संकलन कमी होऊन १०.९ % झाला आहे. यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करदात्यांवरील कराचा बोजा न वाढवता कल्याणकारी योजना सुरु ठेवण्यासाठी नवीन आर्थिक स्त्रोतांची मदत घ्यावी लागेल. अर्थसंकल्पात आय कराची मर्यादा वाढवून ग्राहकांना दिलासा दिला जाऊ शकतो.

पाण्यावर लक्ष दिले जाऊ शकते
अर्थसंकल्पात पाण्यासंबंधी योजनांवर लक्ष दिले जाऊ शकते. अर्थसंकल्पात प्रत्येक घरी २०२४ पर्यंत पाइप्ड वॉटर योजनेविषयी घोषणा केली जाऊ शकते. अर्थमंत्री जल जीवन मिशन आणि नल से जल या योजनांची घोषणा केली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात आहे. जल शक्ती मंत्रालय या योजनांसाठी पालक म्हणून काम पाहिल. २०१९ मध्ये निवडणुकीच्या दरम्यान अशा योजनांची चर्चा झाली होती.

जुन्या योजनांवर राहील नजर
अर्थसंकल्पात पीएम किसान, मनरेगा यांसारख्या जुन्या योजना आणि आरोग्य व शिक्षणासंबंधी योजनांवर लक्ष्य दिले जाऊ शकते. मुख्यत्वे पीएम किसान आणि मनरेगावर अधिक पैसा खर्च केला जाऊ शकतो.

रेल्वेवर असेल लक्ष
मोदी सरकार भारतीय रेल्वेवर पुढील ५ वर्षात जवळपास १० लाख कोटी रुपये खर्च करणार आहे. निवडणूकीआधी पीयुष गोयल यांनी वित्तमंत्री असताना मागील अर्थ संकल्प सादर केला होता आणि त्यावर मानले जात आहे की यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेवर या आर्थिक वर्षात जवळपास १ लाख ६०  हजार कोटी रुपयांचा खर्च करेल. रेल्वेला GBS (Gross Budgetary Support) नुसार जवळपास ६५००० कोटी रुपये वित्त मंत्रालयाकडून मिळण्याचा अंदाज आहे.

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होण्यासाठी महाराष्ट्रात पोषक वातावरण – नामदेवराव जाधव

वंचित बहुजन आघाडीला खिंडार, लक्ष्मण मानेंनी केले गंभीर आरोप