‘कोरोना’ महामारीच्या संकटकालीन काळात काम करणाऱ्या शिक्षकांस सन्मानीत कामे देऊन विमा संरक्षण कवच घोषित करावा : निशा बिडवे

पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना महामारीच्या संकटकालीन काळात काम करणाऱ्या शिक्षकांस सन्मानीत कामे देऊन विमा संरक्षण कवच घोषित करण्यात यावे याबाबत चे निवेदन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा
शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री यांना ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षा निशा बिडवे यांच्यावतीने मेलद्वारे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रात कोरोनासारख्या साथीच्या रोगाने हाहाकार घातल्यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करावा लागला, त्यामुळे राज्यातील सर्वच शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले असताही अध्यापनाच्या कार्यात सदैव तत्परतेने कार्यरत असणाऱ्या शिक्षकांचे मात्र ऑनलाईन, WhatsApp, झुम आणि Google Meet च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे तसेच त्यांना गृहपाठ देणे आणि विविध क्लुप्त्या शिकविणे असे काम या लॉकडाउन च्या काळात करत असतानाच शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापन सुरक्षेसाठी विविथ जिल्हा- तालुका पातळीवर बोलाविण्यात आले.

समाजात शिक्षकांना सन्मानाचे व गुरुतुल्याचे स्थान प्राप्त समजले जाते पण याच शिक्षकांची मोठ्याप्रमाणात अवहेलना करण्याचे काम सध्या सुरू आहे पण हाच शिक्षक समाजातील नविन पिढी घडविण्याचे काम करत असताना त्यांना मात्र न शोभणारी व तुच्छतेची कामे दिली जातात.

कायद्याच्या अनुषंगाने शासकीय – निमशासकीय शिक्षकास नियमानुसार तीन कामे करणे अत्यंत गरजेचे असतात ती म्हणजे –

1) निवडणुकीच्या काळात निवडणुकीचे कामे करणे

2) दर दहा वर्षांनी लोकसंख्येची जनगणना करणे

3) राज्यात जर एखादी नैसर्गिकरित्या आपत्ती उदभवलेली असेल तर त्यांच्या व्यवस्थापणेसाठी जाणे.

अशी तीन कामे जरी नियमानुसार करावयाची असली तरी ती कामे करण्यासाठी नेमलेल्या शासकीय – निमशासकीय कर्मचाऱ्यांना सम्पूर्ण सुरक्षेच्या संरक्षणासहित बोलाविण्यात यावे असे नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आले असताही राज्यशासनाच्या आदेशानुसार जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा अधिकार वापरत अशा शिक्षकांना

1) चेकपोस्ट वर ये जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करणे.

2) दारूच्या दुकानावरील गर्दी नियंत्रित करणे

3) गावागावातील रेशनिंग दुकानावर लोकांना शिस्त लावण्याचे काम करणे

4) विलगीकरण सेंटर वरील लोकांना सांभाळण्यासाठी चौकीदाराचे काम करणे असे विविध प्रकारची लाजवेल असे काम देत असतानाच पाटोदा तहसीलदारांनी तर चक्कच शिक्षकांना घरपोच किराणा देण्यासाठी शिक्षकांचे भ्रमणध्वनी क्रमांक दिले असून या भ्रमणध्वनी क्रमांकावर लोकांनी संपर्क साधून शिक्षकांना किराणा सामानाची यादी द्यायची आहे आणि शिक्षकांनी किराणा दुकानात जाऊन खरेदी करून तो माल घरपोच द्यायचा आहे अशा प्रकारची विविध कामातून शिक्षकांनची अवहेलना करून त्यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांची अवहेलना केली जाते.

अशातच विविध ठिकाणी कोरोनाच्या संकटात मदतीस म्हणून घेतलेल्या शिक्षकांना 10 ते 12 तास विना विमा संरक्षण काम करत असताना बहुतांश शिक्षकांना मरण पत्करावा लागला तरीही शासनाने शिक्षकास अजून कोणत्याही प्रकारचा विमा संरक्षण व विमा कवच जाहीर केलेला नाही त्यामुळे शासनास एकच कळकळीची विनंती करते की राज्यातील शिक्षकांना सन्मानीत असणारी कामे देऊन प्रोत्साहित करून त्यांना त्यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून त्यांना बोलाविण्यात यावे अशी मागणी ग्रॅज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षा निशा बिडवे यांच्याकडून वतीने करण्यात आली आहे.