पाकिस्तानची पहिली ‘ट्रान्सजेंडर’ वकील बनली ‘निशा’, एकेकाळीभीक मागत होती

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – पाकिस्तानची निशा राव आजकाल चर्चेचे केंद्र बनली आहे. निशा ही पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर वकील आहे. निशाने आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे. निशा एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित आहे. जी ट्रान्सजेंडर्ससाठी काम करत आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर वकील निशा राव जगभरातील ट्रान्सजेंडर्ससाठी प्रेरणा बनली आहे. कराची बार असोसिएशनचा परवाना मिळवणारी निशा पहिली ट्रान्सजेंडर आहे. निशा रावच्या संघर्षाची कहाणी जगभरातील लोकांना प्रेरणा देणारी आहे.

लाहोरमध्ये जन्मलेली निशा राव 18 वर्षांची झाली तेव्हा तिने आपले घर सोडून कराचीला पोहोचली. बर्‍याच काळापासून इतर ट्रान्सजेंडर्सप्रमाणे, तिही रस्त्यावर भीक मागून जगली. पण, तिला आपल्यात सुधार करण्याची आवड जागी झाली आणि तिने लॉमध्ये प्रवेश घेतला आणि वेळ काढून अभ्यास करण्यास सुरुवात केली.

कराची बार असोसिएशनने निशा रावला वकिलांचा परवाना जारी केला. निशा राव हिने आतापर्यंत 50 केस लढले आहेत. ट्रान्सजेंडर्ससाठी काम करणार्‍या संस्थेबरोबरही ती संबंधित आहे. निशाला समाजातील इतर घटकांप्रमाणेच ट्रान्सजेंडर्सला यश मिळवताना पाहायचे आहे. ती म्हणाली की, तिला पाकिस्तानची पहिली ट्रान्सजेंडर न्यायाधीश व्हायचे आहे.

पाकिस्तानमध्ये ट्रान्सजेंडर्सला सामान्य लोक म्हणून ओळखण्यासाठी 2018 मध्ये कायदा मंजूर झाला होता. या कायद्यानुसार ट्रान्सजेंडर्सकडून भेदभाव आणि हिंसाचाराच्या शिक्षेची तरतूद आहे.

You might also like