‘ही’ हँडबॅग नीता अंबानींची, ज्याची किंमत 2.6 कोटी रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या नीता अंबानींचा एक फोटो भलताच व्हायरल होत आहे. त्यात आकर्षण आहे. ती म्हणजे त्यांच्या कडे असलेली पर्सचे. यामुळे त्यांच्या राहणीमानाची चर्चा देखील सुरु झाली आहे. रिलायंस फाऊंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांची हँडबैग असलेला फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या बॅगची किंमत 2.6 कोटी रुपये आहे.

पर्सवर 240 हिरे
यात हर्म्स हिमालया बर्किंन बॅगची किंमत 2.6 कोटी रुपये सांगण्यात येत आहे. यात हिरे असल्याचे समजते आहे. या पर्सवर 240 हिरे लावण्यात आले आहेत. हा फोटो करिश्मा कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

ब्रिटिश ऑक्शन हाऊस क्रिस्टीज डॉट कॉम नुसार हर्म्स हिमालया बर्किन बँग, हँड बॅग कलेक्शनमध्ये सर्वात चांगले मानले जाते. नीता अंबानी यांच्याकडे असलेल्या बॅगवर 18 कॅरेट सोन्याचा मिलामा चढवला आहे. तर त्यावर 240 हिरे लावण्यात आले आहेत. बर्किग बॅग किंमतीसाठी आणि सेलेब्रिटिज्सकडून खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. याचे नाव ब्रिटिश एक्ट्रेस आणि सिंगर जेन बर्किंन यांच्या नावाने ठेवण्यात आले आहे.