‘कोरोना’चे व्हॅक्सिन देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचवणार : निता अंबानी

पोलिसनामा ऑनलाईन – रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. हक्कभाग आणि हिस्सा विक्रीतून विक्रमी गुंतवणूक खेचत सहामाहीतच कर्जमुक्त होणार्‍या रिलायन्स समूहाने नव्या वर्षांपासून 5 जी दूरसंचार सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरपर्सन निता अंबानी यांनी पहिल्यांदाच सभेला संबोधित केले.

निता अंबानी यांनी, कोरोनाचे व्हॅक्सिन उपलब्ध होताच ते देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचवण्यासाठी रिलायन्स काम करणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनाविरोधातील लढाई अजून बाकी आहे. जिओच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या मदतीने, संपूर्ण देशभरात मेगा-स्केल कोविड टेस्टिंगसाठी सरकार आणि स्थानिक नगरपालिकांशी भागीदारी करणार आहे. देशभरात जास्तीत जास्त कोविड चाचण्या करता याव्यात यासाठी जिओच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरची मदत घेतली जाईल आणि मी तुम्हाला आश्वासन देते की जसे कोरोनाचे व्हॅक्सिन उपलब्ध होईल ते डिजिटल डिस्ट्रिब्यूशन आणि सप्लाय चेनद्वारे (डिजिटल वितरण आणि पुरवठा साखळीचा वापर करून) देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यात पोहोचेल हे आम्ही सुनिश्चित करू, असेही त्या म्हणाल्या आहेत.