Fitness Goal : मुलगा अनंतला पाहून ‘प्रेरणा’, नीता अंबानींनी केलं ‘एवढं’ वजन कमी, जाणून घ्या कसं

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   नीता अंबानी यांनी मुलापासून तंदुरुस्तीबाबतचे धडे घेतले. मुलाबरोबर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. सुमारे 40 किलो वजन कमी केले.

रिलायन्स इंडस्ट्रीचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीला वजन कमी करायचे होते. अनंत अंबानी यांनी 18 महिन्यांत 118 किलो वजन कमी केले. एका मुलाखतीत त्याची आई नीता अंबानी यांनी मुलाच्या फिटनेसची कहाणी सांगितली. नीता यांनी मुलाच्या प्रेरणेने वजन कमी केल्याचे सांगितले.

नीता अंबानी म्हणाल्या, “मुलापासून तंदुरुस्तीबाबत खूप प्रेरणा मिळाली. मुलाबरोबर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. सुमारे 40 किलो वजन कमी केले.”

नीता यांनी मुलाखतीत सांगितले की गर्भवती असताना वजन 47 वरून 90 किलोवर गेले होते. २०११ मध्ये एका मुलाखती दरम्यान नीता म्हणाल्या, “मी माझ्या गरोदरपणात कॉफीचा आनंद घेतला. वयाच्या 23 व्या वर्षी डॉक्टरांनी मला सांगितले की मी कधीच आई होऊ शकत नाही. माझी दोन्ही मुले ईशा आणि आकाश यांचा जन्म आयव्हीएफच्या माध्यमातून झाला.”

वयाच्या 20 व्या वर्षी अनंतने सेलिब्रिटीचा वैयक्तिक

ट्रेनर विनोद चन्ना यांना वजन कमी करण्यासाठी बोलावले होते. नीता यांनी सांगितले की, “मी अनंतबरोबर आहार घेण्यास सुरवात केली. तो जे खायचा ते मी खात होते. जेव्हा त्याने व्यायाम केला तेव्हा मी देखील केला. तो फिरायला गेला तर मीही गेले. कालांतराने माझे वजन कमी झाले. ” या नित्यकर्माचे पालन करून नीता अंबानी यांना आढळले की वजनही कमी होत आहे. प्रेग्नन्सीच्या आधीची फिगर परत येत आहे. अनंत एक अतिशय कठीण व्यायाम करतो. त्याचे एका वर्षासाठी मी अनुकरण करीत असे. मी दिवसात फक्त 40 मिनिटांचा योग करते.

नीता म्हणाल्या. मी नृत्य, पोहणे आणि योग करते. वजन कमी झाल्यानंतर आहारात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी केल्याचे सांगितले. फळे आणि हिरव्या भाज्या खाते. दररोज बीटरुटचा रस पिते.