नीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये कायमच मिळतात ‘या’ 5 गोष्टी ! यापैकी एकाची गिनीज बुकमध्ये नोंद !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या 56 वर्षांच्या आहेत. परंतु त्यांची स्टाईल ही कायमच पाहण्यासारखी असते. साडी आणि ड्रेस परिधान करणाऱ्या नीता अंबानी यांच्या वार्डरोबमध्ये त्यांच्यासाठी 5 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींशिवाय त्या घरातून बाहेर पडतच नाहीत.

1) डिझायनर लेहंगा – कौटुंबिक सोहळा किंवा कार्यक्रमांसाठी नीता अंबानी एकापेक्षा एक डिझायनर लेहंगा परिधान करत असतात. विशेष सोहळ्यात त्यांची खास पारंपरिक वेशभूषा पाहायला मिळते. घरात एखादी पूजा किंवा लग्न समारंभ असेल तर त्या लाल रंगाचा पोषाखच निवडतात. सब्यासाची मुखर्जी, अबू जानी, संदीप खोसला आणि मनीष मल्होत्रा या प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सच्या कलेक्शनमधील आउटफिट नीता यांना विशेष आवडतात. एवढंच नाही तर सुंदर भरतकाम केलेले लेहंगेही त्यांना विशेष आवडतात.

2) पेस्टल ड्रेस – रेड कार्पेटपासून तर फुश फ्री इव्हेंट (कमी प्रमाणात भागिदारी असलेले कार्यक्रम) आतापर्यंत अशा कित्येक कार्यक्रमात आपण नीता अंबानी यांना अनेक डिझायनर आऊटफिटमध्ये पाहिले असेल. अशा कार्यक्रमात त्यांचा कंफर्टेबल लुक पाहायला मिळतो. अशा कार्यक्रमांसाठी त्या फुल स्लीव्ह्स पेस्टल कुर्त्याची निवड करतात. कॅज्युअल मीटींग असो किंवा जिओ फाऊंडेशनतर्फे एखाद्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवायची असो नीता अंबानी या अनेकदा पेस्टल सुटमध्ये दिसतात. पांढरा आणि हलक्या स्वरूपातील गुलाबी रंगाचे कपडे घालणं त्यांना जास्त आवडतं. गडद रंगापासून त्या शक्यतो दूर राहतात.

3) क्लासिक साडी – जर बॉलिवूड सेलेब्सचे लग्न सोहळे किंवा रिसेप्शन पार्टी असेल तर नीता अंबानी डिझायनर साडी नेसणं जास्त पसंत करतात. यात त्या जास्त सुंदर दिसतात. त्यांच्या कलेक्शनमध्ये एक साडी अशीही आहे जिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

4) बॉसी को-ओर्ड सेट –

नीता अंबानी यांच्या वॉर्डरोब कलेक्शनमध्ये बॉसी को ओर्ड सेटचाही समावेश आहे. त्या एक बिझनेस वुमन आहेत त्यामुळं त्यांच्या वॉर्डरोबमध्ये नक्कीच बॉसी को ओर्ड सेट पाहायला मिळणारच. कामाच्या निमित्तानं त्यांना अनेकदा हाय प्रोफाईल पार्टीत सहभागी व्हावं लागतं. अशा वेळी त्या वेस्टर्न आऊटफिट परिधान करणं पसंत करतात.

5) स्टेटमेंट ज्वेलरी – नीता अंबानी यांच्या वॉर्डरोबमध्ये स्टेटमेंट ज्वेलरीसाठीही खास जागा आहे. राणी हार पासून तर बिब नेकलेस, पारंपरिक नथ आणि मांग टीका असे दागिने बऱ्याचदा त्या लेहंग्यावर परिधान करतात. इतकंच नाही तर पोल्की डायमंडसह पन्ना अनकट ज्वेलरी देखील त्यांना प्रचंड आवडतात.