‘अरमान’च्या लग्नात नीता अंबानी यांच्यासोबत मुलगी ईशाचा ग्लॅमरस ‘लूक’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडच्या कपूर खानदानात सध्या उत्सवाचे वातावरण आहे. काल 3 फेब्रुवारीला करिश्मा आणि करीना कपूरचा चुलत भाऊ अरमान जैन याने गर्लफ्रेंड अनिसा मल्होत्रासोबत विवाह केला होता. अरमानच्या लग्नात अनेक नामांकित सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण या सर्वांमध्ये सर्वांच्या नजरा निता अंबानी आणि तिची मुलगी ईशा अंबानी यांच्यावरच राहिल्या. यांचे काही फोटो व्हायरल झाले आहे.

अरमान जैनच्या लग्नाला नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी या उपस्थित होत्या. लग्नात नीता अंबानी गोल्डन आणि क्रीम कलर कॉम्बिनेशन लेहेंगामध्ये दिसल्या. खुल्या केसात आणि मॅचिंग ज्वेलरीमध्ये नीता अंबानी यांचा लूक खूपच खास होता. ईशा अंबानी लग्नामध्ये डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसलाच्या ब्लश पिंक कलरच्या लेहंगामध्ये दिसली.

फोटोमध्ये ईशा अंबानीच्या लेहेंग्यावर रेशीम धागा सिक्विन आणि हॅंड एंब्रॉयडरीचे फ्लोरल वर्क दिसत आहे. इशा अंबानीने गुलाबी रंगाच्या लेहेंगाला जोडून ग्रीन आणि व्हाईट स्टोनचे नेक आणि कानातले घातले आहेत. ईशा अंबानीने खुल्या केसांनी तिचा लुक पुर्ण केला होता.

ईशा अंबानीने हा गुलाबी लेहेंगा दुसऱ्यांदा परिधान केला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये आपल्या कौटुंबिक सोहळ्यात तिने प्रथमच हा लेहंगा परिधान केला होता. अरमान जैनच्या लग्नात अनिल अंबानी आणि टीना अंबानीही यांनी देखील हजेरी लावली होती.