Nitesh Pandey | सिनेसृष्टीवर शोककळा; हॉटेलमध्ये आढळला प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचा मृत्यदेह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitesh Pandey | सिरीयलमधील आणि चित्रपटांतील दमदार भूमिकांमुळे घराघरांत पोहचलेला प्रसिद्ध अभिनेते नितेश पांडे यांचे ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या अकस्मात निधनामुळे चंदेरी दुनियेत शोककळा पसरली आहे. (Nitesh Pandey)

नाशिक येथील इगतपुरीमध्ये (Igatpuri) नितेश पांडे हे शूटिंगसाठी गेले होते. त्यावेळी ज्या हॉटेलमध्ये राहिले होते तिथेच कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे (Cardiac Arrest) त्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती नाशिक पोलिसांनी (Nashik Police) दिली आहे. नितेश हे इगतपुरीमधील हॉटेल ड्यू ड्रॉप (Hotel Dew Drop) येथे थांबले होते. संध्याकाळी त्यांनी जेवणाची ऑर्डरही दिली होती. मात्र जेवण घेण्याआधीच काळाने त्यांच्यावर आघात केला. हॉटेल स्टाफने पांडेंनी दिलेल्या जेवणाची ऑर्डर देण्यासाठी रुमची बेल अनेकदा वाजवली मात्र, खूप वेळ आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे मास्टर चावीच्या (Master key) सहाय्याने नितेश पांडेंच्या हॉटेल रुमचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी नितेश पांडे बेशुद्ध अवस्थेत आढळले. रात्री त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

 

नितेश पांडेंच्या (Nitesh Pandey News) अशा दुर्देवी मृत्यूमुळे सिनेसृष्टीबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
नितेश यांनी अनेक मालिकांमध्ये चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.
नुकतेच त्यांनी अनुपमा (Anupamma) या मालिकेत काम केले होते. ते त्यांचे शेवटचे काम ठरले.
याआधी त्यांनी ओम शांती ओम (Om Shanti Om), दबंग २ Dabangg 2,
खोसला का घोसला (Khosla Ka Ghosla) या चित्रपटातही काम केले आहे. त्यांचे जाणे सर्वांच्या मनाला चटका लावणारे आहे.

 

Web Title :  Nitesh Pandey | nitesh pandey died what had happened before actor death
nashik police statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा