Nitesh Rane | शिवसेना-राणे पुन्हा आमनेसामने; ‘त्या’ 2 प्रकल्पावरुन नितेश राणेंचा शिवसेनेवर ‘प्रहार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitesh Rane | मागील काही दिवसापासून शिवसेना आणि राणे (Shiv Sena vs Rane) वाद चव्हाट्यावर आला होता. या दोघांत आव्हान- प्रतिआव्हान पाहायला मिळालं. यावरुन राज्यात राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. नुकतंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय कॉलेज व चिपी विमानतळावरुन (Chipi Airport) राणे आणि शिवसेना वादाला नवं तोंड फुटलं होतं. याच विषयावरुन आता पुन्हा एकदा राणे आणि शिवसेना आमने-सामने आल्याचे पाहायला मिळते. आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) ट्वीट्च्या माध्यमातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नितेश राणे?
सिंधुदुर्गमधील वैद्यकीय कॉलेजला संबंधित प्राधिकरणांनी मान्यता दिलीय. तर, सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ परवानाधारक झाले आहे. यावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नितेश राणेंनी ट्वीटच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात पालकमंत्री उदय सामंत कोकणातील शक्ती कपूर” असल्याची टीका नितेश राणे यांनी केली. तसेच, चिपी विमानतळ व वैद्यकीय महाविद्यालय श्रेय नारायण राणे (Narayan Rane) यांचे आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, आमच्या कोकणाचे शक्ती कपूर (Shakti Kapoor) व कोकणातील सचिन वाझेचे भाऊ सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दोन घोषणा केल्या. त्यातील एक म्हणजे कोकणात येणारे वैद्यकीय महाविद्यालय. या महाविद्यालयाबद्दल आम्हाला सर्व जणांना आनंद आहे. पण या महाविद्यालयाची परवानगी नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर मिळाली तर चीपी विमानतळासाठीच्या विमानसेवा सुरू करण्याच्या परवानगीदेखील नारायण राणेंमुळेच मिळाली, असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे नितेश राणेंनी म्हटलं आहे की, ‘2014 ते 2019 मध्ये तुमच्या शिवसेनेचे अरविंद सावंत (Arvind Sawant) हे केंद्रात मंत्री होते.
तेही कोकणचे सुपुत्र आहेत. तेव्हा तुम्हाला कशी परवानगी मिळाली नाही? तेव्हा तर तुम्ही भाजपमध्ये युतीत होतात. तेव्हा परवानगी कशी मिळाली नाही.
राणे मंत्री झाल्यावर कशा परवानग्या मिळतात.
केंद्र सरकारची मदत घेऊन हे दोन्ही प्रकल्प मार्गी कसे लागतील याचा विचार उदय सामंत यांनी करावा.

Web Titel :- Nitesh Rane | bjp leader attacks on shivsena mla uday samant over chipi airport

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यामध्ये सर्वाधिक हिंजवडी, वाकड, म्हाळुंगे, ताथवडे, बाणेर, सूस, बालेवाडी या परिसरात गृह खरेदी; शहरात 8 टक्क्यांनी घरांच्या खरेदीमध्ये वाढ

Javed Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा आरोप; म्हणाली – ‘कोर्टावरील विश्वास उडाला’

PMC GB Meeting | पुणे मनपात निधीसाठी विरोधकांकडून गाणी गाऊन ‘आयुक्तांकडे’ विनवणी; तर सत्ताधाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा