Nitesh Rane | दिशा सॅलियनला घरी सोडणारी कार सचिन वाझेची? भाजप नेत्याच्या दाव्याने सर्वत्र उडाली खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अभिनेता सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनबाबत (Disha Salian) एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पार्टीच्या दिवशी रात्री दिशा सॅलियन ज्या कारने घरी गेली, ती कार सचिन वाझेची (Sachin Waze) आहे का, असा दावा राणेंनी (Nitesh Rane) केला आहे.

 

नितेश राणे यांनी केवळ एकच ट्विट केले नाही तर एकामागून एक ट्विट करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिल्या दिवसापासून मालवणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. दिशा सॅलियन प्रकरणात आता त्यांना अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणारा आणि दिशा सोबत राहणारा रोहित राय काहीच का बोलत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

 

 

ही तीच कार आहे का?
अन्य एका ट्विटमध्ये नितेश राणे (Nitesh Rane) म्हणतात की, महिला आयोग आणि मालवणी पोलिसांना मुंबईच्या महापौरांनी पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ असा की, ८ जूनच्या रात्री काहीच घडले नाही असे दाखवण्याची राज्य सरकारकडून मोठी तयारी सुरु आहे. ते किमान आपली कबर खोदत आहे याचा आंनद तरी आहे अशी टीकाही त्यांनी केली. त्याच रात्री म्हणजे ८ तारखेला काळ्या मर्सिडीजमधून दिशाला तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. संबंध? अशी एक शंका नितेश राणे यांनी उपस्थित केली. मालवणी पोलिसांनी तपास योग्य केला नाही म्हणून तो सीबीआयकडे देण्यात आला. बरोबर ना ? आणि आता महिला आयोगाने याच पोलिसांना अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे? हे किती योग्य आहे? नेमके कोणाला वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिशा सॅलियनबाबत पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी बदनामीकारक वक्तव्य केले होते.
त्यावर महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी कारवाई करण्याची मागणी महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली होती.
त्या मागणीची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar)
यांनी दाखल घेऊन पोलिसांना ४८ तासांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
स्वतः रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून ही माहिती दिल्याने राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp leader0nitesh rane big claims over disha salian case and sachin waze connection

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Economic Offences Wing (EoW) Raid | खाण विभागाच्या उपसंचालकांच्या घरावर छापे

 

Mumbai High Court | भाजप नेत्याला हायकोर्टाचा दणका ! आधी 2 लाख भरा मगच सुनावणी घेऊ

 

Weight Loss drink | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ आश्चर्यकारक ड्रिंक, वेगाने वितळू लागेल पोटाची चरबी