Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा, न्यायालयाकडून ‘या’ अटीशर्थींसह जामीन मंजूर

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने (Sindhudurg District Court) सुनावणी (Hearing) करत नितेश राणे यांचा जामीन मंजूर केला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात (Santosh Parab Attack Case) नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली होती. परंतु प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नितेश राणे यांच्यासह स्वीय सहायक राकेश परब (Rakesh Parab) यालाही जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे.

 

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी काल पूर्ण झाली असून आज याबाबतचा निर्णय दिला आहे. 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नितेश राणेंना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच नितेश राणे यांनी आठवड्यातून एक दिवस कणकवली पोलीस ठाण्यात (Kankavali Police Station) हजेरी लावावी. तसेच चार्ज शिट (Charge Sheet) दाखल होईपर्यंत कणकवलीत न येण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत (Special Public Prosecutor Pradip Gharat), भूषण साळवी (Bhushan Salvi) यांनी तर बचाव पक्षाच्यावतीने वकील सतीश माने शिंदे (Advocate Satish Mane Shinde), संग्राम देसाई (Sangram Desai) यांनी जोरदार युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश हांडे (Judge Hande) यांनी आज निकाल जाहीर केला.

 

काय आहे प्रकरण ?
सिंधुदुर्ग
जिल्हा बँकेच्या निवडणूक (Sindhudurg District Bank Election) रणधुमाळीत शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवऱ्यात अडकले.
18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता.
परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत (Satish Sawant) यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत.
त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात संतोष परब जखमी झाले होते.

 

Web Title :- Nitesh Rane | BJP MLA and leader nitesh rane finally granted bail in santosh parab attack case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा