Nitesh Rane | ‘महाविकासआघाडीवर नागासारख्या बसलेल्या शरद पवारांपर्यंत…’; नितेश राणेंचा पवारांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Nitesh Rane | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईमध्ये (Mumbai) धडक मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चामध्ये जाण्याआधी भाजप नेते आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

 

कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आज गर्दी करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोलावलेलं नाही. विधानसभेत बसलेले महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, घरातून बाहेर न पडलेले मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) नागासारखे बसलेले शरद पवार यांच्यापर्यंत आपल्याला संदेश पोहोचवाचा आहे. तुम्ही वाकड्या नजरेने मुंबईकडे पाहाल तर भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.

 

नवाब मलिक या गद्दाराचा राजीनामा आम्ही का मागतोय? नवाब मलिक हा काही संत नाही. त्याने घरी पाठवलेल्या बिर्याणीत (Biryani) मसाला की टाकला म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागत नाही. तर नवाब मलिकने मुंबईवर हल्ला करणाऱ्या दाऊदबरोबर व्यवहार केला, त्याचे पैसे खिशात टाकले म्हणून आपण त्याचा राजीनामा मागत आहोत, अशा शब्दात मलिकांवर बोलताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी टीका केली.

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने काढलेला मोर्चा आझाद मैदानापासून (Azad Maidan)
हाकेच्या अंतरावर असलेल्या मेट्रो सिनेमाजवळ अडवण्यात आला.
मोर्चेकऱ्यांनी विधानभवनावर धडकण्याचा अट्टाहास धरल्यानंतर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis),
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), नितेश राणे, प्रसाद लाड (Prasad Lad), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar),
आशिष शेलार (Ashish Shelar) आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar)
यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp mla nitesh rane controversial comment about sharad pawar at bjp morcha for nawab malik resignation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Best Exercise For Slim Body | शरिर सडपातळ करण्यासाठी करा ‘या’ एक्सरसाईज

 

Nandurbar Police | महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला ‘कोरोना’ योध्यांचा सत्कार

 

Blood Sugar Level | सकाळच्या वेळी किती असावी शुगरची लेव्हल, आरोग्यासोबत करू नका खेळ

 

Gold-Silver Rate Today | …म्हणून सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट