Nitesh Rane | नितेश राणेंना 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, न्यायालयाचा निर्णय

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – संतोष परब हल्लाप्रकरणी (Santosh Parab Attack Case) भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांना न्यायालयानं पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली होती. आज त्यांची पोलीस कोठडी संपली आहे. त्यामुळे त्यांना परत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी नितेश राणे (Nitesh Rane) यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी केली आहे. पण न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) दिली आहे. पोलीस कोठडी संपली असली तरी आता त्यांचा मुक्काम कोठडीतच असणार आहे. आज जामिनासाठी अर्ज (Bail Application) करण्यात येणार आहे.

 

संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (Rakesh Parab) यांना एकाच वेळी कणकवली दिवाणी न्यायालयात (Kankavali Civil Court) हजर केले गेले. दोघांचीही आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले.

 

आमदार नितेश राणेंना पुण्याला (Pune) नेऊन त्यांची चौकशी करायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी (Government Prosecutors) म्हटलं. तर नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई (Lawyer Sangram Desai) यांनी यावर युक्तिवाद करत आरोपीला पुण्याला घेऊन जाण्याची आवश्यकता का आहे असा सवाल केला होता. त्यामुळे नितेश राणेंना पोलीस कोठडी देऊ नये असाही युक्तीवाद त्यांनी केला.

आमदार राणेंना गोव्यातील (Goa) त्यांच्या हॉटेलवर घेऊन चौकशी केली असता त्यांचा सीडीआर रिपोर्ट (CDR Report) आणि नितेश राणे,
राकेश परब यांचं तिथे झालेल्या संभाषणाची चौकशी पोलिसांनी केली. त्यातून त्यांना काही माहिती मिळाली आहे,
मात्र अजून चौकशीसाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.
दोन दिवसांत आरोपीकडून मोबाईल आणि सिम कर्ड जप्त केले,
अजून तपास बाकी असून पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला.

 

Web Title :- Nitesh Rane | BJP MLA nitesh rane get judicial custody till february 18 court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Crime News | BJP आमदाराच्या सुनेचा धक्कादायक आरोप; ‘माझा सेक्स स्लेव्ह म्हणून केला वापर’

 

Gaangubai Kathiawadi : Ajay Devgan First Look | ‘गंगूबाई काठियावाडी’ मधील अजय देवगनचं फर्स्ट लूक झालं प्रदर्शित, व्हायरल झाली त्याची मनोरंजक नवाबी स्टाईल !

 

Multibagger Stock | Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ मल्टीबॅगर शेयरमध्ये लागले अपर सर्किट, एक महिन्यात 95% वाढली किंमत

 

Amruta Fadnavis | मुंबईत वाहतूक कोंडीमुळे 3 % घटस्फोट ! अमृता फडणवीस महिलांच्या प्रायव्हसीवर बोलल्या; म्हणाल्या – ‘माझे मानसिक संतुलन ढासळलेले नाहीय’