Nitesh Rane | ‘सावरकरांवर टिका करणाऱ्यांवर यांची खरी निष्ठा…” नितेश राणेंकडून संजय राऊतांच्या ट्विटला प्रतिक्रिया देत शिवसेनेवर पलटवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या काही दिवसात महाराष्ट्राचे राजकारण वादग्रस्त विधानांमुळे भलतेच तापले आहे. सुरवातीला काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील (Swatantryaveer Savarkar) वक्तव्यामुळे, तर आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) आणि भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (BJP Spokeperson Sidhanshu Trivedi) यांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि मनसे (MNS, Eknath Shinde Group) यांनी शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) (Uddhav Thackeray Group) ‘मैदाना’त ओढले. पहिल्यांदा हा वाद संजय राऊत (Sanjay Raut), उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अशा थोड्या नेत्यांमध्ये सुरु होता आता त्यात भाजपचे आमदार नितेश राणेंनी (BJP MLA Nitesh Rane) उडी घेतली आहे. नितेश राणेंनी (Nitesh Rane) शिवसेनेवर पलटवार केला आहे.

“आम्हाला राहुल गांधींच्या वक्तव्याचे समर्थन करता आले असते. मात्र, आम्ही ते केले नाही. आम्ही राहुल गांधींचा कोणत्याही प्रकारे बचाव केला नाही. हाच भाजप आणि आमच्यातला फरक आहे. दुसरं कोणी छत्रपती शिवाजी महाराजांवर असं काही बोललं असतं तर भाजपाने थयथयाट केला असता. पण, आज तुमचे राज्यपाल आणि प्रवक्ते शिवाजी महाराजांचा अपमान करणारी वक्तव्ये करत आहेत. शिवाय, हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे. तरीही, भाजप त्यांचा बचाव करत आहे. म्हणजेच भाजपचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भातील प्रेम खरे नाही,” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी राहुल गांधी आणि त्यांच्यात झालेल्या फोनबद्दल माहिती देणारे ट्विट केले होते.

त्या ट्विटला रिप्लाय देत नितेश राणेंनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. “भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय.” अशा आशयाचे ट्विट संजय राऊतांनी केले होते. त्याला प्रतिक्रिया देत नितेश राणे म्हणाले,”आता भोंग्यातून यांचं खरं प्रेम बाहेर पडलंय. सावरकरांवरती टिका करणाऱ्यांवर यांची खरी निष्ठा आहे. अशा ढोंगी हिंदूप्रवृत्तीचा मी निषेध करतो. @RahulGandhi”

‘शिवसेनेची खरी निष्ठाही महाराष्ट्राप्रती (Maharashtra) किंवा शिवाजी महाराजांप्रती
(Chhatrapati Shivaji Maharaj) नसून, ती राहुल गांधी आणि काँग्रेसप्रती आहे’,
अशी टीका नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्विट मधून केली.

Web Title :- Nitesh Rane | bjp mla nitesh rane reply to shiv sena mp sanjay raut on twitter