Nitesh Rane | ‘जो गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या …;’ नीतेश राणेंनी दिली धमकी

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – जो गाव माझ्या विचारांचा सरपंच देईल, त्या गावाचा मी विकास करेन. पण, जर का माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर त्या गावाला मी निधी देणार नाही, विकास करणार नाही, अशी धमकी भाजपा आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिली आहे. कणकवलीत एका प्रचार सभेत नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी हे विधान केले. त्यामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

 

राणे म्हणाले, आता आम्ही सत्तेत असून, सर्व काही आमच्या हातात आहे. चुकूनही जर येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपया निधी देणार नाही. आता याला हवे तर धमकी समजा किंवा अन्य काही समजा. पण माझे गणित स्पष्ट आहे. त्यामुळे मतदान करताना हे लक्षात ठेवा, असा इशारा राणे यांनी मतदारांना दिला. सगळा निधी माझ्या हातात आहे. मग तो जिल्हा नियोजन निधी असो, ग्रामविकास निधी असो किंवा केंद्राचा निधी असो. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत, असेही राणे म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.
त्यावेळी राणे बोलत होते. त्यांच्या या विधानाचा शिवसेनेने पुरेपूर फायदा घेतला आहे.
भाजपला सत्तेचा माज कसा चढला आहे, हे नीतेश राणे यांच्या विधानाने स्पष्ट होते,
असे कुडाळचे शिवसेना आमदार वैभव नाईक म्हणाले. राणे सरळ सरळ मतदारांना धमक्या देत आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री माझ्या खिशात आहेत, असे त्यांनी जाहीर सांगितले.

 

Web Title :- Nitesh Rane | bjp mla nitesh rane threatens voters to not give fund

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune NCP On Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांना सन्मति दे भगवान प्रार्थना ! पत्रकारांवरील दबावाच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुक आंदोलन

IND Vs BAN Test | बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

Pimpri Chinchwad Fire News | पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीत शॉर्ट सर्किट; चार्जिंगला लावलेल्या 15 इलेक्ट्रिक गाड्या जळून खाक

Pune Crime | पत्नी अन् तिच्या कुटुंबाच्या त्रासाला वैतागून पतीची आत्महत्या; पत्नीसह चौघांवर FIR; मुंढवा परिसरातील घटना